• Home
  • क्राईम
  • केंद्रीय विद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक; पैसे परत मागितल्याने आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी
Image

केंद्रीय विद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक; पैसे परत मागितल्याने आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी

प्रतिनिधी

खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयात पहिलीत प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची एक लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे परत मागितल्याने आरोपीने तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत एकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार एनडीए रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अजित रामकृष्ण घाटपांडे (रा. शीतल प्लाझा, कात्रज-कोंढवा रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराची आरोपी घाटपांडे यांच्याशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. खडकवासला परिसरातील गिरीनगर येथील केंद्रीय विद्यालयात मुलीला पहिलीत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष आरोपीने दाखविले होते. तक्रारदार घाटपांडेला वारजे भागातील एका हॉटेलमध्ये भेटले. तक्रारादारकडून एक लाख ४३ हजार रुपये घेतले. तक्रारदारासह त्यांच्या ओळखीतील आणखी काहीजणांनी घाटपांडेला पैसे दिले होते.

पैसे घेतल्यानंतर त्याने प्रवेश मिळवून न दिल्याने तक्रारदाराने पैसे परत मागितले. पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदाराने घाटपांडेला जाब विचारला. तेव्हा ‘मी तुम्हाला संपवून टाकेल किंवा मी आत्महत्या करेल’, अशी धमकी घाटपांडेने त्यांना दिली. त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप तपास करत आहेत

घाटपांडेने केंद्रीय विद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Releated Posts

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026