• Home
  • क्राईम
  • लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात दोन खून
Image

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात दोन खून

प्रतिनिधी

कात्रज भागातील दत्तनगर परिसरात भाजी विक्रेत्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली. भाजी विक्री व्यवसायाच्या वादातून खून झाल्याचे माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरात एकाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली. खून झालेल्याची ओळख पटलेली नाही.

विलास जयवंत बांदल (वय ५२, रा.त्रिमुर्ती रेसिडन्सी, वंडर सिटीजवळ, कात्रज) असे खून झालेल्याभाजी विक्रेत्याचे नाव आहे. कात्रज बाह्यवळण मार्गावर दत्तनगर बस थांब्याजवळ बांदल यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक तपासात बांदल यांचा खून भाजी विक्री व्यवसायाच्या वादातून दोघांनी केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. खून झालेली व्यक्ती फिरस्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी गौतम घनश्याम तुरुपमारे (वय ३६, रा. पर्वती ) याला पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ असलेल्या भुयारी मार्गात भिक्षेकरी आसरा घेतात. भुयारी मार्गात काहीजण अमली पदार्थांचे सेवन करतात. अमली पदार्थांची नशा करताना झालेल्या वादातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी गौतम मजूरी करतो. तो फिरस्ता असून, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026