• Home
  • क्राईम
  • नागरिकांनीच पकडले चोर, ‘स्मार्ट’ पोलीस पोहचले दोन तासानंतर…
Image

नागरिकांनीच पकडले चोर, ‘स्मार्ट’ पोलीस पोहचले दोन तासानंतर…

प्रतिनिधी

भरदुपारी चोरी करण्यासाठी दोन चोर घरात घुसले. त्यांनी घरात चोरी केली आणि पळून जाण्याच्या तयारीत असतानाच शेजाऱ्यांना चोर दिसले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली. दोन्ही चोरांनी पहिल्या माळ्यावरून उड्या घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तीतील नागरिकांनी त्यांना पकडले. हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस चक्क दोन तासांनी पोहचले. त्यामुळे प्रतिसादाची विक्रमी वेळ नोंदविण्याचा नागपूर पोलिसांचा दावा मात्र सपशेल फोल ठरला आहे.

हुडकेश्वर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. विशाल गायकवाड (२४) रा. कैकाडीनगर, विक्की उर्फ सायमन रामटेके (२४) रा. रामटेकेनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथिदार शुभमसह दोघे फरार आहेत. दोघेही अट्टल चोरटे असून नुकतेच ते कारागृहातून सुटून बाहेर आले आहे. त्यांना दारू व ड्रग्सचे व्यसना आहे. व्यसन भागविण्यासाठी ते भरदिवसाच चोरी करीत असल्याची त्यांनी कबुली दिल्याची माहिती आहे. या चोरट्यांनी हुडकेश्वर परिसरात टेहळणी केली. मेहरबाबानगर येथील रहिवासी फिर्यादी निलेश तांदुळकर (४०) हे कुटुंबियांसह समारंभासाठी गेले होते. ही संधी साधून चोरटे घरात घुसले. सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल असा एकूण एक लाख ४३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला.

दरम्यान, शेजारच्यांना तांदूळकर यांच्या घरात कोणीतरी घुसल्याचा संशय आला. त्यामुळे शेजारी गोळा झाले. विशाल आणि विक्की हे दोघेही वरच्या माळ्यावरुन उड्या मारल्याने जखमी झाले. त्यांना नागरिकांनी पकडून ठेवले. हुडकेश्वर पोलिसांना फोन करुन माहिती दिली. मात्र, हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठण्यासाठी चक्क दोन तास लावले. उशिर झाल्यामुळे एका जागृत नागरिकाने विचारणा केली असता पोलीस कर्मचारी हितेश कडू यांनी नागरिकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात रविवारी लेखी तक्रार करुन कारवाईची मागणी केली.

चोर पकडल्याची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातून दोन बीट मार्शल रवाना झाले होते. मात्र, रस्त्यात दुचाकी नादुरुस्त झाली. त्यामुळे दुसरे वाहन उपलब्ध होईपर्यंत त्यांनी वाट बघितली. त्यामुळे घटनास्थळावर पोहचण्यास उशिर झाला, अशी प्रतिक्रिया ठाणेदार कैलास देशमाने यांनी दिली.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026