• Home
  • क्राईम
  • दामदुप्पटीचे आमिष! ‘बंटी-बबली’ने केली तब्बल साडेपाच कोटींनी फसवणूक
Image

दामदुप्पटीचे आमिष! ‘बंटी-बबली’ने केली तब्बल साडेपाच कोटींनी फसवणूक

प्रतिनिधी

कंपनीत गुंतवणूक केल्यास दामदुप्पट रक्कम परत करण्याच्या आमिषाला पुन्हा शेकडो नागपूर बळी पडले. एका बंटी-बबलीने शेकडो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करीत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणासह त्याच्या पत्नी व दोन बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला आहे. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे.

वासुदेव सखाराम राऊत असे तक्रारदाराचे नाव आहे. २०२१ साली ते सेवानिवृत्त झाले व एका परिचिताच्या सांगण्यावरून त्यांनी त्रिमूर्तीनगरातील नीलेश उईके (४०) व त्याची पत्नी प्रियांका उईके (३६) यांची भेट घेतली. आरोपीने त्याची कॅप्टी इन्व्हेस्टमेंट कंपनी असून आमच्याकडून शेअर बाजारात पैसे लावण्यात येतात. गुंतवणूक करणाऱ्यांना नियमितपणे नफा दिला जातो असा दावा त्यांनी केला. त्यांच्या कंपनीत नीलेशच्या बहिणी नेहा रोशन मेश्राम (३५, कॉसमॉस टाऊन, त्रिमूर्तीनगर) व रश्मी उईके-गोडे (४२, हैदराबाद) यादेखील भागीदार असल्याची त्यांनी माहिती दिली.

राऊत यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फेब्रुवारी २०२३ पर्यंत २० लाख रुपये गुंतविले व त्यावर त्यांना ९.६४ लाख नफा मिळाल्याचे आरोपींनी सांगितले. गुंतवणूक करत असताना आरोपींनी प्रियांका हिच्या नावाचा २० लाखांचे धनादेश राऊत यांना दिला होता. ज्यावेळी राऊत यांनी आरोपींना रक्कम परत मागितली तेव्हा ते टाळाटाळ करू लागले. त्यामुळे त्यांनी तो २० लाखांचा धनादेश बँकेत टाकला. मात्र तो वटलाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चौकशी सुरू केली. तेव्हा आणखी २९ जणांकडून आरोपींनी पैसे घेऊन गंडा घातल्याची बाब समोर आली. राऊत यांनी राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व पोलिसांनी चारही आरोपींविरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026