• Home
  • क्राईम
  • दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केला आईचा खून
Image

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केला आईचा खून

प्रतिनिधी

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने आईला दांडक्याने बेदम मारहाण करून तिचा खून केला. ही घटना १३ ते १५ मे दरम्यान येरवड्यात घडली असून, याप्रकरणी मुलासह नातवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल मोहन नेटके (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मयूर मोहन नेटके (रा.येरवडा) आणि अल्पवयीने नातवावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मंगल नेटके यांची भाची संध्या अरुण वाघमारे (वय ५०) यांनी तक्रार दाखल केली आहे.

मंगल नेटके यांना मुलगा मयूर नेटके याने दारु पिण्यासाठी पैसे मागितले होते. परंतु तिने पैसे न दिल्याच्या रागातून मयूर आणि अल्पवयीने नातवाने तिला दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्याने मंगलला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील रिदम सोसायटी समोरील मोकळ्या जागेत अज्ञाताने हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा खून केला. राजेंद्र रामभाऊ शेजुळ (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी भाग्यश्री राजेंद्र शेजुळ (वय २९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस पांढरे तपास करत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026