• Home
  • क्राईम
  • पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीवर पतीचे अत्याचार, राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Image

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीवर पतीचे अत्याचार, राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी

शहरामध्ये अमानवीय घटना घडली आहे. पत्नीवर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाच्या बाजूला होल पाडून कुलूप बसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीसदेखील चक्रावले आहेत. याप्रकरणी ३० वर्षीय आरोपी पतीला अटक करण्यात आली असून २८ वर्षीय पीडीतेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दिनांक ११ मे रोजी सतत संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या पत्नीला आरोपी पतीने बेदम मारहाण केली. आधी ब्लेडने गुप्तांगावर वार केले. दोन्ही हात पाय बांधून लोखंडी खिळ्याने गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडले. तिथं पितळी कुलूप बसवलं असल्याचं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

अमानवीय आणि राक्षसी कृत्याबद्दल पीडीतेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अद्यापही पीडित विवाहित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे दाम्पत्य नेपाळ येथील आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर, आरोपी हा वॉचमनचे काम करतो आणि महिला गृहिणी आहे. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनीदेखील हळहळ व्यक्त केली आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026