• Home
  • क्राईम
  • वानवडीत सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा
Image

वानवडीत सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा

प्रतिनिधी

वानवडीतील महंमदवाडी परिसरात असलेल्या सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा घालण्यात आला. शस्त्राच्या धाकाने पेढीतील दागिने लुटून चोरटे पसार झाले. भरदिवसा दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली.महंमदवाडी रस्त्यावरील वाडकर मळा परिसरात बी. जी. एस. ज्वेलर्स सराफी पेढी आहे. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास चोरटे खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरले. चोरट्यांनी सराफी पेढीचे मालक आमि कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखविला. जीवे मारण्याची धमकी देऊन सराफी पेढीतील दागिन्यांची लूट करून चोरटे पसार झाले. सराफी पेढीत दरोडा पडल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली.

या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, परिमंडळ पाचचे उपायुक्त आर. राजा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चोरट्यांचा माग काढण्याचे आदेश तपास पथकाला दिली. चोरटे दुचाकीवरुन पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हडपसर, वानवडी, कोंढवा परिसरात नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, चोरट्यांनी चेहरे रुमालाने झाकल्याचे दिसून आले आहे.

Releated Posts

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026