• Home
  • क्राईम
  • १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून गुंडाने केला बलात्कार; जवळपास ५ ते ७ अल्पवयीन मुलींना अडकवले जाळ्यात
Image

१४ वर्षीय मुलीचे अपहरण करून गुंडाने केला बलात्कार; जवळपास ५ ते ७ अल्पवयीन मुलींना अडकवले जाळ्यात

प्रतिनिधी

मोमीनपुऱ्यात एका युवकाचा खून करणाऱ्या आरोपीने कारागृहातून सुटून आल्यानंतर १४ वर्षीय मुलीचे अपहरण केले. तिला एका मित्राच्या घरात डांबून सलग दोन दिवस बलात्कार केला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

राहुल श्रीकृष्ण गायकवाड (वय २१, रा. गरीब नवाजनगर, यशोधरानगर) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात आरोपीचे नाव आहे. राहुल हा कुख्यात गुन्हेगार असून त्याने अल्पवयीन असतानाच खून केला होता. त्यानंतर तो अनेक गुन्ह्यात सहभागी होता. सध्या तो भाजीपाल्याचा व्यवसाय करतो, तर पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आठव्या वर्गात शिकते. ती जरीपटका परिसरात राहते. आरोपीची अल्पवयीन मुलीशी मागील १५ दिवसांपूर्वी ओळख झाली. १७ मे रोजी तिच्या घराशेजारी लग्न होते. तेथे आरोपी राहूल आला होता. तेथे काही वेळपर्यंत थांबल्यानंतर तो पीडित मुलीला भेटला.

आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून फूस लाऊन पळवून नेले. तिला जरीपटका परिसरात एका मित्राच्या घरी ठेवले. तिच्यावर सलग दोन दिवस बलात्कार केला. त्यानंतर तिच्या आईला मुलगी घरी न आल्यामुळे काळजी वाटली. तिने मुलाचा शोध घेतला. मात्र, ती आढळून आली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप काईट यांनी आरोपी राहुल विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तांत्रिक तपास करून त्याला मित्राच्या घरातून अटक केली. त्यावेळी पीडित मुलीलाही पोलिसांनी ताब्यात घेऊन आईवडिलांकडे सोपवले. आरोपी राहुल लहानपणापासून गुन्हेगार आहे. अल्पवयीन असताना त्याने मोमिनपुरातील एका युवकाचा खून केला होता. परंतु, अल्पवयीन असल्यामुळे तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर त्याने एकापाठोपाठ अनेक गुन्हे केले. अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या सवयीचा आहे. त्याने आतापर्यंत ५ ते ७ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली.

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने वाडी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला जाळ्यात अडकवले. जवळपास ५ महिन्यांपासून तो तिचे शोषण करीत होता. शेवटी कंटाळून पीडितेने वाडी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. अनूप सुरेश घटी (२१) रा. निपानी सोनेगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026