मुख्य मजकुरावर जा
Thursday, 10 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 02 December 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याबाबतच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
December 2, 2022 1 मिनिट वाचन 8,518 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जुलै व ऑगस्‍ट २०२२ या कालावधीत झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे शेतपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते. सदर शेतपिकांची झालेल्‍या नुकसानापोटी शासनाने हेक्‍टरी १३,६०० रू. , महत्‍तम ३ हेक्‍टरपर्यंत नुकसान भरपाई मंजूर केली आहे. नुकसान भरपाई संदर्भात पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींनी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्‍त झालेल्‍या आहेत. या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत. गावातील शेतीचे नुकसानीचे पंचनामे प्रत्‍यक्ष शेतावर न जाता करण्‍यात आलेले आहेत, प्रत्‍यक्षात नुकसान झालेल्‍या शेताचे क्षेत्र कमी नोंदविण्‍यात आले आहे ,काही नदीकाठील गावांचे सर्व्‍हेक्षण व पंचनामे करण्‍यात आले नाही, नुकसान भरपाई मंजूर झालेल्‍या शेतक-यांची यादी ग्राम पंचायत स्‍तरावर लावण्‍यात आलेली नसल्‍याने गावातील कोणत्‍या शेतक-याला किती नुकसान भरपाई मिळाली किंवा कसे हे लक्षात येत नाही, सर्व्‍हेक्षण करणारे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी हलगर्जीपणाने सदर सर्व्‍हेक्षण केले आहे अशा तक्रारी शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केल्या आहेत. या तक्रारींचे तातडीने निराकरण करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख