• Home
  • क्राईम
  • विवाहितेचे अपहरण करून अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Image

विवाहितेचे अपहरण करून अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी

एका विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तिच्या जवळील दागिने व रोखही हिसकाविण्यात आली. ही धक्कादायक घटना येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शेख आसीम शेख कलीम (२८) रा. येवदा व मोबिन पठाण (३५) रा. खोलापूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित २१ वर्षीय विवाहिता ही ४ मे रोजी आपल्या मुलीसह भावाच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमाकरिता येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आली होती. त्यावेळी तिच्यासोबत पतीने दिलेले १ लाख ५० हजार रुपये रोख, सोन्याची पोत, एक छोटे मंगळसूत्र, नथ, सोन्याचे कानातले, मुलीचे हातातील सोन्याचे कडे, लॉकेट, अंगठी व चांदीचे कडे असे सोन्या-चांदीचे दागिनेदेखील होते. दरम्यान, तेथे तिची आरोपी शेख आसीम याच्याशी भेट झाली. त्यांच्यात मोबाइलवर संवादसुद्धा झाला. त्यावेळी शेख आसीमने तिला प्रेमजाळ्यात ओढले.

माझ्यासोबत चल, आपण लग्न करू, दुसऱ्या गावात जाऊन आपला संसार मांडू, असे त्याने तिला सांगितले. त्याचवेळी कुणाला काहीही सांगितले, तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकीन, अशी धमकीही त्याने दिली. त्यामुळे पीडित विवाहिता ही ९ मे रोजी सकाळी शेख आसीम व मोबिन पठाण यांच्यासोबत घरून निघून गेली. त्यानंतर शेख आसीम याने पीडित विवाहितेवर जबरीने अत्याचार केला. १३ मे रोजीसुद्धा त्याने तिचे लैंगिक शोषण केले. त्याचवेळी कुणीतरी पीडित विवाहितेकडील सोन्याचे दागिने व रोख हिसकावून घेतली. शेख आसीम व मोबिन पठाण यांच्या तावडीतून सुटका झाल्यावर पीडित विवाहितेने येवदा ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

Releated Posts

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026