• Home
  • क्राईम
  • अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या
Image

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या

प्रतिनिधी

येवलेवाडी येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या वसतिगृहात तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अभिषेक प्रवीण शेळके (वय २२, रा. शिर्डी, अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. अभिषेक हा मूळचा शिर्डी येथील असून, तो पुण्यात शिक्षणासाठी आला होता. अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाला तो होता. मंगळवारी तो वसतिगृहातील रूममध्ये एकटाच होता. सायंकाळी त्याचे मित्र परीक्षा देवून वसतिगृहात आले. त्यांनी दरवाजा वाजविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अभिषेकच्या आत्महतेमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, त्याला काही विषय अवघड गेले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. कोंढवा पोलीस तपास करत आहेत.

Releated Posts

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026