• Home
  • क्राईम
  • भोसरीत बनावट पाच बांगलादेशी अटकेत; बनावट आधार कार्ड, पारपत्र जप्त
Image

भोसरीत बनावट पाच बांगलादेशी अटकेत; बनावट आधार कार्ड, पारपत्र जप्त

प्रतिनिधी

बनावट कागदपत्रांसह बेकायदा राहणाऱ्या पाच बांगलादेशी घुसखोरांना दहशत विरोधी पथकाने भोसरीतील शांतीनगर येथून अटक केली. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले आणि पारपत्र जप्त करण्यात आले आहे.

शामीम नुरोल राणा (वय २६), राज उर्फ सम्राट सदन अधिकारी (वय २७) जलील नुरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार (वय ३८), वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीजऊल हक हिरा (वय २६) आणि आझाद शमशुल शेख उर्फ मोहंमद अबुल कलाम शमशुद्दिन फकीर (वय ३२) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशत विरोधी पथकाचे पोलीस शिपाई सुयोग लांडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी हे बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना राहत होते. ते दोन्ही देशांच्या सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने आले. बनावट आधार कार्ड, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले आणि पारपत्र बनवून शांतीनगर येथे भारतीय नागरिक असल्याचे भासवून राहत होते. शांतीनगर येथील ओम क्रिएटीव्ह टेलर्स या कंपनीत ते काम करीत होते. याबाबत दहशतविरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी छापा टाकून पाचही बांगलादेशींना अटक केली. फौजदार केंद्रे तपास करीत आहेत.

Releated Posts

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026