• Home
  • क्राईम
  • पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीचा प्रताप; पिकअप चालवताना दुचाकीला उडवले, तरुणाचा मृत्यू
Image

पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीचा प्रताप; पिकअप चालवताना दुचाकीला उडवले, तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी

कल्याणीनगर परिसरातील अपघात प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असताना शिरूर तालुक्यातही एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा गंभीर होता, की पिकअपने मोटारसायकलसह चालकास ३० फूट फरफटत नेले. या अपघातात दुचाकीचालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला, तर महेंद्र बांडे हा गंभीररीत्या जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लेंढे कुटुंबीय मालवाहतूक टेम्पो घेऊन जात होते. गाडीमध्ये आई-वडील, मुलगा आणि मुलगी होते. अरणगावातील पोलीस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी गाडी चालवत होती. तिच्यासोबत शेजारील आसनावर पोलीस पाटील संतोष लेंडे बसले होते. मुलीने तिच्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून दुचाकीला समोरून धडक देत अपघात केला. अपघात झाल्यानंतर मदत न करता ते दोघेही वाहन सोडून तेथून निघून गेले. या संदर्भात सतीश विठ्ठल मेमाणे (रा. वडगाव बांडे, ता. दौंड) यांनी फिर्याद दाखल केली असून, याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Releated Posts

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026