• Home
  • क्राईम
  • तरुणाकडून पोलीस अधिकाऱ्याची मालिश; कल्याणीनगरमधील घटनेची चित्रफित व्हायरल
Image

तरुणाकडून पोलीस अधिकाऱ्याची मालिश; कल्याणीनगरमधील घटनेची चित्रफित व्हायरल

प्रतिनिधी

कल्याणीनगर परिसर अपघाताच्या घटनेमुळे चर्चेत आले असताना शनिवारी (१ जून) रात्री नाकाबंदीत ताब्यात घेण्यात आलेल्या एका तरुणाकडून पोलीस अधिकाऱ्याने पाय दाबून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून, वाहतूक विभागातील त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कल्याणीनगर भागात शनिवारी रात्री वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली होती. कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर भरधाव वेगाने वाहन चालविणारे वाहनचालक, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आता अचानक नाकाबंदी करण्यात येत आहे. वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.

कल्याणीनगर परिसरात शनिवारी रात्री पोलिसांचे पथक वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी एका मोटारीतून तरुण निघाले होते. तरुण मुळचे सणसवाडीतील आहेत. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. गाडीची कागदपत्रे नसल्याने त्यांनी मोटारचालकाला दंड केला. त्यानंतर नाकाबंदीतील पोलीस कर्मचारी मोटारीतील एका तरुणाला घेऊन काही अंतरावर खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्याकडे घेऊन गेला. पोलीस अधिकाऱ्याने तरुणाची कानउघाडणी केली. त्याला पाय चेपायला सांगितले. कारवाईच्या भीतीमुळे तरुणाने पोलीस अधिकाऱ्याचे पाय चेपून दिले. त्यानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली. नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाकडून पाय चेपण्याची चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026