दिनांक ०६ डिसेंबर २०२२ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाकडून प्रवासी वाहतूक नियमन अधिसूचना

Uncategorized

दिनांक ६ डिसेंबर २०२२ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या चैत्यभूमी दादर, मुंबई येथील समाधीचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पित करण्याकरीता महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो आंबेडकर अनुयायी मोठया संख्येने लांब पल्ल्याच्या व उपनगरीय रेल्वे गाडयांनी दादर, मुंबई येथे दरवर्षी येत असतात. कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाकडून घालण्यात आलेल्या निबंधांमुळे सन २०२० व २०२९ मध्ये आंबेडकर अनुयायांना बाहेरुन मुंबईमध्ये येणे शक्य झालेले नाही.यावर्षी राज्य शासनाकडून कोरोना पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले सर्व प्रकारचे निर्बंध उठविण्यात आलेले असून, रेल्वेसेवा पुर्ण क्षमतेने चालू आहे. सद्या रेल्वेतील प्रवाशांची संख्या जवळपास ७२ लाखांपर्यंत असून त्यात दररोज १० ते १५ हजार नवीन पासधारकांची वृध्दी होत असल्याने ६ डिसेंबरपर्यंत ही संख्या ७५ लाखापर्यंत पोहचणे अपेक्षित आहे त्यामुळे यावर्षी ट्रेनने येणारे आंबेडकर अनुयायी पुर्ण क्षमतेने मोठया प्रमाणात उस्र्फुतपणे येणे अपेक्षित आहे. परिणामी दि.०५/१२/२०२२ व दि.०६/१२/२०२२ रोजी रेल्वेचे नियमित प्रवाशी व दर्शनासाठी आलेले अनुयायी हे एकत्र आल्यामुळे स्टेशन परिसरात अफाट गर्दी होईल.दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी व स्थानकाबाहेर पडण्यासाठी मुख्यत्वे १) दादर मध्य रेल्वे स्थानक पूर्व-पश्चिम जोडणारा मध्य मोठा पादचारी पुल, २) उत्तर दिशेकडील स्कायवॉक पादचारी पुल, (३) दक्षिण दिशेकडील महानगर पालिका पादचारी पुल यांचा वापर करण्यात येतो. दि.०५/१२/२०२२ व दि.०६/१२/२०२२ रोजी दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण होणार असल्याने रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवाशी व अनुयायी त्याचबरोबर बाहेरुन रेल्वे स्थानकात येणारे प्रवाशी व अनुयायी है एकमेकांसमोर येऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते व त्यातून चेंगराचेंगरी सारखा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता सदर दिवशी पादचारी पुलांच्या वापराबाबत काही निर्बंध घालणे आवश्यक आहे.याकरीता सदर कालावधीमध्ये गर्दीचे योग्यप्रकारे नियमन होण्यासाठी व रेल्वे प्रवाशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, महिला यांच्या सुरक्षिततेसाठी मी कैसर खालिद, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३६ (क) (ग), ३७ (४) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामधील दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकांमध्ये दिनांक ०५/१२/२०२२ चे ००:०१ पासून ते दिनांक ०६ / १२ / २०२२ चे रात्रौ २४:०० वाजेपर्यंतच्या कालावधीकरिता याद्वारे पुढील प्रमाणे आदेश देत आहे.

१) दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानक पूर्व-पश्चिम जोडणारा मध्य मोठा ब्रिज :- •

दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिम जोडणारा मध्य मोठा ब्रिज व फलाट क्र. ६ वरील सर्वप्रवेशद्वार शहर हद्दीतुन रेल्वे स्थानकात येणाऱ्या अनुयायी व प्रवाशांकरीता बंद राहील.सदर ब्रिज फक्त उपनगरीय / मेल गाड्यांनी येवून दादर येथे उतरणाऱ्या प्रवाशांना पूर्व-पश्चिमेकडे शहरहद्दीत बाहेर जाण्याकरीता तसेच दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील एका फलाटावरुन दुसऱ्या फलाटावर जाण्याकरीता खुला राहील.

२) स्कायवॉक ब्रिज :-

सदर ब्रिज स्थानकाबाहेरील पुर्व-पश्चिम शहर हद्दीतून येणाऱ्या अनुयायी व दैनंदिन रेल्वे प्रवाशांकरीता दादररेल्वे स्थानकांवरील फलाटावर येण्याकरीता खुला राहील.• दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकात उपनगरीय / मेल गाड्यांनी येवून दादर येथे उतरणाऱ्या प्रवाशांना व अनुयायी यांना पूर्व-पश्चिमेकडे शहर हद्दीत बाहेर जाण्यास खुला राहील.

३) महानगर पालिका ब्रिज :-•

सदर ब्रिज स्थानकाबाहेरील पुर्व-पश्चिम शहर हद्दीतून दादर रेल्वे स्थानक येथे फलाटावर येणाऱ्या अनुयायी व दैनंदिन रेल्वे प्रवाशांकरीता खुला राहील. • सदर पादचारी पुलावर मध्य रेल्वेमधील परेल बाजूकडील जिना ( पाय-या) प्रवाशांना चढण्या-उतरण्याकरिता व माटुंगा बाजूकडील जिना ( पाय-या) फक्त चडण्याकरिता वापरण्यात येईल.दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकात उपनगरीय / मेल गाड्यांनी येवून दादर येथे उतरणाऱ्या प्रवाशांना वअनुयायी यांना पुर्व-पश्चिमेकडे शहर हद्दीत बाहेर जाण्यास बंद राहील,

४) मध्य मोठ्या पादचारी पुलाच्या उत्तरेकडील मध्य रेल्वेवरील पादचारी पुल हा दादर मध्य रेल्वे स्थानकातील फलाटावर उतरणाऱ्या प्रवाशांना फलाट बदलण्याकरीता व पूर्व बाजूस शहर हद्दीत जाण्याकरीता खुला राहील.

(५) मध्य मोठ्या ब्रिजच्या उत्तरेकडील मध्य व पश्चिम स्थानकांना जोडणारा पादचारी पुल हा फक्त फलाटावरील प्रवाशांकरिता फलाट बदलण्याकरिता खुला राहील. तसेच सदरच्या पादचारी पुलावरुन मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रवाशी हे मध्य रेल्वेच्या हददीपासून स्कायवॉक पादचारी पुलाकडे वळविण्यात येतील.

६) दादर पश्चिम रेल्वे स्थानक फलाट क्र. १ वरील मध्य मोठया ब्रिजच्या दक्षिणेकडील प्रवेशव्दार व उत्तरेकडील सुविधा गेट प्रवेशव्दार हे रेल्वे प्रवाशी व अनुयायी यांना शहर हददीतून फलाटावर प्रवेश करण्यास बंद राहील.

७) स्कायवॉकच्या लगत दक्षिणेकडील ब्रिज (पश्चिम रेल्वे) :-•

दादर पश्चिम रेल्वे स्थानक फलाट क्र.२/३, ४/५ वर उतरणाऱ्या प्रवाशांना सदर पुलावर येवून स्कायवॉक मार्ग शहर हद्दीत पुर्व व पश्चिम दिशेने जाता येईल. तसेच स्कायवॉक मार्गे प्रवाशांना मध्य रेल्वे स्थानक फलाट क्र.३/४, ५ व ६, ७/८ वर प्रवेश करता येईल. तसेच सदर पुलावर दादर पश्चिम स्थानकाचे फलाट क्र. १ वरील जिन्यावरुन व लिफ्टने प्रवेश करता येईल.