• Home
  • क्राईम
  • अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ रस्त्यावर फेकले
Image

अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ रस्त्यावर फेकले

प्रतिनिधी

अनैतिक संबंधातून गर्भवती राहणाऱ्या तरुणीने चोवीस तासापूर्वी जन्म झालेले बाळ रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकले. तिच्या रडण्याच्या आवाजाने रस्त्याने जाणाऱ्या युवकाचे लक्ष घेले. त्याने तिकडे धाव घेतली असता चिमुकले बाळ आढळून आले. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ६ वाजता कुंजीलाल पेठ परिसरात उघडकीस आली. माहिती मिळताच अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळ सुखरूप आहे.

कुणीतरी परिसरातील तरुणीनेच या बाळाला फेकल्याची चर्चा आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाला कुठेतरी सोडून मोकळे होण्याचा हा प्रकार असावा, अशी चर्चा परिसरात होती. अजनी पोलीस ठाण्यांतर्गत कुंजीलालपेठ परिसरातील रहिवासी लुटे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या गल्लीत एक दिवसाचे स्त्री जातीचे बाळ होते. ती गल्ली फारशी वापरण्यात नसल्याने कचरा आणि माती पसरलेली आहे. त्या ठिकाणी कुणीतरी बाळाला सोडून निघून गेले. सकाळी ६ वाजताच्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज एका युवकाला आला. तो थेट कचऱ्याच्या ढीगाऱ्याजवळ गेला. त्याने शोध घेतला असता चिमुकली आढळून आली. लुटे यांनी लगेच अजनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चिमुकलीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डॉक्टरांनी त्वरित उपचार केल्यामुळे बाळ सुखरूप आहे. दरम्यान पोलिसांनी अपत्य जन्माची लपवणूक करणाऱ्या तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, बाळ ठेवणाऱ्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत. सकाळपासून पोलिसांनी जवळपासचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले. मात्र, काही सुगावा लागला नाही. कुणाची नुकतीच प्रसूती झाली काय, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026