• Home
  • क्राईम
  • धक्कादायक! कसब्यात घटस्फोटीत महिलेच्या दुसऱ्या पतीचा कोयत्याने वार करून खून; गुंड राजा मारटकरच्या मुलासह साथीदारावर गुन्हा
Image

धक्कादायक! कसब्यात घटस्फोटीत महिलेच्या दुसऱ्या पतीचा कोयत्याने वार करून खून; गुंड राजा मारटकरच्या मुलासह साथीदारावर गुन्हा

प्रतिनिधी

पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरा विवाह केल्याने खडकी बाजारातील गुंड राजा मारटकर याच्या मुलाने तरूणाचा खून केल्याची धक्कादायक घटना कसबा पेठेतील पवळे चौक परिसरात घडली. घरात शिरून आरोपी आणि त्याच्या साथीदाराने तरुणावर कोयत्याने वार केले. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी गंभीर जखमी झाली.

सुमीत पटेकर (रा.पवळे चौक कसबा पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, प्राजक्ता सुमीत पटेकर (वय 34, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सनी राजेंद्र मारटकर ( रा.गवळी वाडा, खडकी बाजार ) याच्यासह साथीदारावर खून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात प्राजक्ता गंभीर जखमी झाल्या आहेत.

सुमीत पटेकर आणि त्याची पत्नी पवळे चौकातील अग्रवाल प्राईड सोसायटीत राहायला आहेत. गुरूवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी सनी याने प्राजक्तापासून घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर प्राजक्त यांनी सुमीत याच्याशी विवाह केला. आरोपी सनी याच्या डोक्यात राग होता. सनी आणि साथीदार दुपारी अडीचच्या सुमारास घरात शिरला. त्यावेळी प्राजक्ता, त्यांची सासू आणि पती सुमीत गप्पा मारत होते. काही कळण्याच्या आतच सनी आणि त्याच्या साथीदाराने सुमीत याच्यावर कोयत्याने वार केले. हा प्रकार पाहून प्राजक्ताने सुमीत याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सनीने कोयत्याने वार केले . गंभीर जखमी झालेल्या सुमीत याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल , अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त रंगनाथ उंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशीरा फरासखाना पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी सनी याचे वडील राजा मारटकर याची खडकी बाजारात दहशत होती. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले होते. टोळी युद्धातून मारटकर याचा तंबी गोस आणि साथीदारांनी खून केला होता.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026