• Home
  • क्राईम
  • ऊसतोड कामगार पुरविणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण
Image

ऊसतोड कामगार पुरविणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण

प्रतिनिधी

ऊसतोड कामगार पुरविणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण केल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बप्पा (रा. मुदगड, जि. लातूर) विक्रम जाधव (रा. अंबुलगा जि.लातुर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुरेखा राजेंद्र चव्हाण (वय ३७, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा चव्हाण यांचे पती राजेंद्र चव्हाण ठेकेदार आहेत. ते शेतकऱ्यांना ऊसतोड कामगार पुरवितात. बप्पा याने राजेंद्र यांना ऊसतोड कामगार पुरविण्यासाठी तीन लाख रुपये दिले होते.

राजेंद्र यांनी ऊसतोड कामगार पुरविले नाहीत. त्यामुळे बप्पा आणि जाधव चिडले होते. हडपसर भागातील मंत्री मार्केट परिसरातून राजेंद्र यांना मारहाण करून आरोपींनी धमकावले. त्यांना मोटारीत घालून आरोपी पसार झाले. आरोपींनी पतीला अज्ञात ठिकाणी डांबून ठेवल्याची फिर्याद सुरेखा यांनी दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026