श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात सायबर सिक्युरिटी संदर्भात मार्गदर्शन…

इतर

प्रतिनिधी

निंबुत तेथील श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात दिनांक 3/12/2022 शनिवार रोजी सकाळी 9.30 वाजता क्विक हिल मार्फत सायबर सिक्युरिटी संदर्भात शारदाबाई पवार महाविद्यालय शारदानगरच्या विद्यार्थिन कृतिका किशोर देशमुख व मयुरी विठ्ठल गाडेकर यांनी मार्गदर्शन केले.यामध्ये त्यांनी मोबाईलचा वापर तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, व्हाट्सअप अशा विविध ॲपच्या माध्यमातून सायबर अटॅक कशाप्रकारे केले जातात व त्यापासून कसे सुरक्षित रहावे व सायबर गुन्हेगारीचे आज जगात कशाप्रकारे संकट निर्माण झाले आहे. व यामध्ये लहान मुले कशाप्रकारे बळी पडत आहेत. याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधून सखोल मार्गदर्शन केले. मोबाईलचा अतिवापर व विविध ॲप वापरताना विशेष काळजी घ्यावी याविषयी विद्यार्थ्यांना उदबोधित केले. सायबर सुरक्षेमुळे आपण आपली माहिती सुरक्षित ठेवू शकतो असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिपाली ननावरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन भगत राजाराम यांनी केले तर आभार श्री सूर्यवंशी विजय यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री सतीशभैय्या काकडे दे, उपाध्यक्ष मा.श्री भिमराव बनसोडे व मानद सचिव मा. श्री मदनराव काकडे दे यांनी शुभेच्छा दिल्या.