• Home
  • क्राईम
  • सिंहगड रस्ता परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तीन महिला ताब्यात
Image

सिंहगड रस्ता परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तीन महिला ताब्यात

प्रतिनिधी

सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. पोलिसांनी वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी मसाज पार्लरचालक पूजा दत्तात्रय जगदाळे (वय ३५, रा. धायरी, सिंहगड रस्ता) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात एका इमारतीत मोरया आयुर्वेद मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत मसाज पार्लरमधून तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले.

महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी मसाज पार्लरचालक जगदाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तपास करत आहेत.

Releated Posts

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

सहकारनगरातील पद्मावती परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड, तब्बल १५ वाहनांचे नुकसान

प्रतिनिधी पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByBymnewsmarathi Jan 22, 2026