• Home
  • क्राईम
  • जीव धोक्यात घालून रिल्सचे चित्रीकरण, पोलिसांकडून तरुण-तरुणीविरूद्ध गुन्हा दाखल
Image

जीव धोक्यात घालून रिल्सचे चित्रीकरण, पोलिसांकडून तरुण-तरुणीविरूद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी

रिल बनवण्याच्या नादात अनेकजण जीव धोक्यात घालत असल्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार कात्रज नव्या बोगद्याजवळील दरी पुलाजवळ घडला. येथील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका बंद इमारतीच्या छतावरून तरुण-तरुणीने धोकादायकरित्या रिल बनवले. हे रिल वेगाने प्रसारित होताच भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये एका बंद पडलेल्या इमारतीच्या छतावर तरुण झोपला असून त्याच्या हाताला धरून तरुणी खाली लटकताना दिसत आहे. येथून खाली पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गही दिसत आहे. या तरुणीने हाताशिवाय कशाचाच आधार घेतलेला दिसत नाही. मागील काही दिवसांत हा रिल समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. हा पडीक बंगला पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळील असल्याचे दिसते. भारती विद्यापीठ पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन भादंवि कलम ३३६ आणि ३३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हा रिल पंधरा दिवसांपूर्वी बनवलेला दिसत आहे. सध्या आम्ही अज्ञात तरुण-तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. समाजमाध्यमातील खात्यावरून रिल बनविणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. – दशरथ पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

हा व्हिडिओ पुणे-बंगळुरू महामार्गाजवळील एका पडीक इमारतीवरून चित्रीत करण्यात आला आहे. या इमारतीवर चढून तरुण आणि तरुणी स्टंटबाजी करताना दिसत आहेत. ग्रीप स्ट्रेंथ चेक म्हणजेच हाताची पकड किती घट्ट आहे, हे तपासण्यासाठी स्टंटबाजी करत असल्याचे लिहून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. दोन ते तीन मजली उंच इमारतीएवढ्या उंचीवरून तरुणी या तरुणाचा हात पकडून अधांतरी लटकत असल्याचे दिसत आहे. हा परिसर स्वामी नारायण मंदिराजवळ आहे. स्टंटबाजी करणाऱ्यांबरोबर त्यांचा हा स्टंट चित्रीत करणारे तरुण देखील व्हिडिओत दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडिओवरून संबंधित तरुण-तरुणीवर टीका केली आहे

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026