• Home
  • क्राईम
  • पार्टीचा बेत; चिकन, मासोळी शिजवण्यावरून वाद अन् डोक्यात घातला दगड…
Image

पार्टीचा बेत; चिकन, मासोळी शिजवण्यावरून वाद अन् डोक्यात घातला दगड…

प्रतिनिधी

उपराजधानीतील सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत बांधकाम मजूरी करणाऱ्या चौघांनी सुट्टीच्या दिवशी पार्टीचा बेत रचला. खान्यासाठी चिकन व मासोळी आणली. हे पदार्थ शिजवण्याची तयारी सुरू असतांनाच तिघांचा चवथ्या मजूरासोबत वाद झाला. राग अनावर झाल्याने तिघांनी दगडाने ठेचून त्याचा खून केला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी पसार आहे.

लम्बु उर्फ शिवम (३०) असे दगावलेल्या मजूराचे नाव आहे. तर जितेंद्र बाळाराम रावटे (३५) रा. गाव विटाल, तह. राजनांदगाव (छत्तीसगड), अखिलेश धोंडुलाल सहारे (२८) रा. अट्टाकोड, शिवनी, जि. बालाघाट, दिपक असे तिन्ही आरोपींचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत मिहान जवळ सुर्या रेसिडन्सीचे बांधकाम सुरू आहे. येथे मजुरांचा तुटवडा असल्याचे बघत ठेकेदाराने नागपूर रेल्वे स्थानकावरून या चौघांनाही कामासाठी साईटवर आणले.

चारही मजूरांकडे राहण्याची सोय नव्हती. त्यामुळे त्यांना निर्माणाधीन इमारतीच्या जवळ टिनचे शेड असलेली खोली रहायला उपलब्ध केली गेली. दरम्यान, २० जूनला सुट्टीच्या दिवशी चारही आरोपींनी घरी पार्टी करण्याचा बेत रचला. त्यासाठी चिकन, मासोळीची भाजी करण्याचे निश्चित झाले. ही भाजीही आणली गेली. त्यानंतर तिघांनीही मद्यपान केले. त्यानंतर चिकन व मासोळी शिजवण्यावरून तिघांचा चवथ्या लम्बु उर्फ शिवम या मजूराशी वाद झाला. त्यात शिविगाळ सुरू होऊन संतापलेल्या तिन्ही आरोपींनी लम्बुच्या तोंडावर दगड मारला. लम्बु रक्ताच्या थारोड्यात पाडल्यावर तिघेही घाबरले. तातडीने तेथील उपस्थितांनी लम्बुला जवळच्या अखिल भारतीय आयुविज्ञान संस्था (एम्स)मध्ये दाखल केले.

उपचारादरम्यान लम्बुचा मृत्यू झाला. या प्रकरणात ठेकेदार बळीराम शिवराम मोगले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी जितेंद्र रावटे आणि अखिलेश सहारे या दोन्ही आरोपींना अटकही करण्यात आली असून तिसरा दिपक नावाचा आरोपी पसार आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

सदर प्रकरणातील तीन आरोपी व चवथा दगावलेला व्यक्ती अशा चारही मजूरांचा मुक्काम नागपूर रेल्वेस्थानक परिसरात होता. चारही आरोपींना मद्यासह इतरही व्यसन होते. त्यामुळे कुटुंबियानी चौघांनाही घरातून हद्दपार केले होते. त्यातही चौघांचाही एक- मेकांशी परिचय नव्हता. हे चारही व्यक्ती मिळेत ते काम करून मिळालेल्या मजुरीतून मद्यपान करत होते. त्यामुळे चारही मजूरांना ठेकेदार कामासाठी मिहान जवळील निर्माणाधीन इमारतीच्या साईटवर घेऊन आला होता.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026