• Home
  • क्राईम
  • वडकी गावात सापडल्या जिलेटिनच्या कांड्या
Image

वडकी गावात सापडल्या जिलेटिनच्या कांड्या

प्रतिनिधी

दिवे घाट पायथ्याशी असलेल्या वडकी गावच्या परिसरात स्फोट घडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ६७ जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. बाँम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळावरुन जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर -सासवड रस्त्यावरील वडकी गावातील गावदरा वस्तीत ६७ जिलेटिनच्या कांड्या (डिटोनेटर) सापडल्या. गावदरा वस्तीजवळ डोंगर असून, तेथे कांड्या सापडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी बाॅम्ब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) घटनास्थळी पाचारण केले. जिलेटिनच्या कांड्याची तपासणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. जिलेटिनचा कांड्यांचा वापर खोदकामासाठी करण्यात येतो. खोल खड्डे, तसेच विहिरी खोदण्यासाठी कांड्याचा वापर करण्यात येतो.

Releated Posts

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

सहकारनगरातील पद्मावती परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड, तब्बल १५ वाहनांचे नुकसान

प्रतिनिधी पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByBymnewsmarathi Jan 22, 2026