प्रतिनिधी
बारामती -: बारामती तालुक्यामध्ये शहरामध्ये धक्कादायक अशी घटना म्हणजे बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित लक्ष्मण बगाडे यांचे वडील डॉ. लक्ष्मण सुभाजी बगाडे ते सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जेष्ठ नागरिक उपाध्यक्ष बारामती शहर तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य सिल्वर जुबली सदस्य त्यांचा कार्यकाळ हा जनतेची सेवा करण्यात गेला आणि त्यांच्या कुटुंबिया वरती त्यांच्यावरती काळाने घाला घातला.
काय घडलं नेमक सोमवारी दिनांक 8 जुलै 24 रोजी वेळ होती सायंकाळी 5 वाजून 59 मिनिटाची डॉ.लक्ष्मण बगाडे हे नेहमीप्रमाणे दळण आणण्यासाठी सातव चौकामधून तांदळवाडी कडे जाणाऱ्या रोडनी सात गिरणी आहेत त्या ठिकाणी दळण आणण्यासाठी गेले होते तो रोड अत्यंत गजबजलेला व गर्दीचा आहे त्या रोडला स्पीड ब्रेकर नाही आणि वेगाचा कंट्रोल नाही. अचानक भरधाव वेगामध्ये एक टू व्हीलर डबल सीट फुल नशेमध्ये असणाऱ्या इस्मानी त्यांना जोरासा डॅश दिला. असा ड्रेस दिला की डॅश बसण्याने त्यांच्या मेंदूला लागले व कानातून रक्त तसेच डाव्या हाताचा खांदा मोडला, मांडी मोडली, गुडघ्याचा चुरा झाला असा भयानक हिट- रन अपघात झाला.
या घटनेने पूर्ण कुटुंब धक्क्याने कोलमुडून गेले. त्यांचे मित्र तसेच पाहुणे यांना देखील धक्का बसला.
एक्सीडेंट झाल्यानंतर उपचारासाठी ज्यांनी एक्सीडेंट केला त्यांनी पाहिले सुद्धा नाही सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती मिळत आहे की त्यांची किरण आहे त्यांनी इतर काही दोघा तिघांनी त्यांना ॲम्बुलन्स ला कॉल करून बोलावले ती ॲम्बुलन्स मेहता हॉस्पिटल ची होती आणि ते पेशंट मेहता या ठिकाणी घेऊन गेले . सगळं होत असताना त्यांना उपचार उशिरा मिळाला कारण की बघणाऱ्यांची फक्त गर्दी होती पण उपचाराला कोणी घेऊन जाण्यास लवकर तयार नव्हते नक्की या मागचा हेतू काय?
लवकर त्या ठिकाणी मदतीला धावून का आले नाही? बरेच जण सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहेत माझ्या काही ओळखीची सुद्धा आहेत. परंतु त्यांनी लवकर पेशंट हॉस्पिटल ला का घेऊन गेले नाही? एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात
असे सर्व असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला व बगाडे कुटुंबिया वरती व त्यांच्या मित्रपरिवार तसेच पाहुण्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळला
या प्रकरणामध्ये बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर तसेच शहराचे अध्यक्ष जय दादा पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे शहराध्यक्ष तुकाराम मोरे सिल्वर जुबली चे डीन डॉक्टर महेश जगताप तसेच डॉक्टर पी एम कदम पुणे या सर्वांनी धीर देण्याचे व उपचारादरम्यान कशी मदत होईल याकडे सहकार्य केले त्यांचे मनापासून आभार
असं सर्व असताना दोन दिवस त्या ठिकाणी एक्सीडेंट ज्या गाडीने केला त्याचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने ज्याने एक्सटेंड घडवून आणला त्यांनी ची गाडी त्या ठिकाणावरून गायब पळवून घेऊन जात असताना चा व्हिडिओ देखील बारामती लाईव्ह च्या हाती लागलेला आहे.
हा एक्सीडेंट नसून फ्री प्लॅनिंग करून मर्डर केला आहे असा संशय या ठिकाणी निर्माण होत आहे
कारण एक्सीडेंट करणारे हे बारामती नगरपालिकेचे कर्मचारी होते. बारामती लाईव्ह च्या माध्यमातून बारामती मधील नगरसेवक तसेच गटनेतेच्या बातम्या तसेच मुख्य अधिकारी यांच्या बातम्या प्रसारित केलेल्या होत्या याचा राग मनात धरून ही घटना घडवून आणली आहे का?
तसेच मागील काही दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या विरोधात उपोषणाला बसलो बारामती शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात बातम्या प्रसारित केल्या होत्या.
डॉक्टर लक्ष्मण बगाडे याचा खूप मोठा आधार तसेच पाठिंबा खंबीर साथ ही बारामती लाईव्ह मुख्य संपादक अमित बगाडे यांना होती.
बारामती लाईव्ह चे संपादक अमित बगाडे हे कोणाच्या जीवावर उड्या मारतात म्हणून त्यांचा आधारस्तंभ काढून घ्यायचा या हेतूने हा फ्री प्लॅनिंग एक्सीडेंट मर्डर केला आहे की काय? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार बारामती लाईव्ह च्या हाती बरेच या घटनेचे पुरावे हाती लागलेले असून या घटनेमध्ये जे कोणी रोडचे कॉन्ट्रॅक्टर जे जे जबाबदार असतील अशा सर्वांवरती कायदेशीर कडक कारवाई होईल का?
लवकरच पुढील भागात घटनेचे आणखीन सत्य बारामती लाईव्ह च्या माध्यमातून जनतेच्या समोर येणार आहे.