प्रतिनिधी – फिरोज भालदार
बारामती तालुक्यातील होळ गावामध्ये विजेचा शॉक बसून हनुमंत सुनील सुर्यवंशी वय २५ वर्षे रा. होळ या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास घडली .
मिळालेल्या माहितीनुसार हनुमंत सुर्यवंशी हा होळ येथे विजेच्या डीपीचा झालेला घोटाळा काढत होता यावेळी त्याला शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजत आहे . वडगाव निंबाळकर पोलीस यांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची नोंद घेतली आहे . पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत .