काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यांवरती मोठी कारवाई निरा येथे करून सुद्धा कोणाच्या आशीर्वादाने निरा बारामती रोड लगत हॉटेलमध्ये होत आहे अवैद्य दारू विक्री?

क्राईम

प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील निरा येथे काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य रित्या दारू वाहतूक करणाऱ्या वरती मोठी कारवाई केली त्याचं नागरिकांमधून कौतुकही करण्यात आले मात्र निरा मोरगाव रोडवरील काही हॉटेल्स वरती विनापरवाना अवैधरित्या दारू मोठ्या प्रमाणात विकत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. या हॉटेल्स वरती राज्य उत्पादन शुल्क विभाग अथवा पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे

 खरंच या अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांची माहिती संबंधित प्रशासनाला नसेल का? की माहिती असून देखील जाणीवपूर्वक त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे? या अवैद्य दारू विक्रीतून प्रशासनातील नक्की कोणाचे किसे गरम त केले जात नाहीत ना? अशी देखील चर्चा स्थानिक नागरिकांमधून होत आहे. या हॉटेल्स वरती अनेक वेळा वादविवाद देखील झाल्याच्या घटना घडल्याची चर्चा होत आहे. एखादा बळी गेल्यावरच संबंधित प्रशासन या अवैद्य दारू विक्रेत्यांच्या मुस्क्या आवळणार आहे का असे देखील नागरिकांमधून बोलले जात आहे. सदरील हॉटेल्स हे कायमस्वरूपी सीलबंद करून कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.