• Home
  • क्राईम
  • पाचशेची नोट देत मद्य मागितले, पण हातात पडल्या बेड्या…
Image

पाचशेची नोट देत मद्य मागितले, पण हातात पडल्या बेड्या…

प्रतिनिधी

मेहकर शहरातील एका धक्कादायक घटनाक्रम मधून नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चाणाक्ष दारू विक्रेत्याला नोटाचा संशय आला आणि मग संबधीताच्या हाती दारू ऐवजी बेड्या ठोकण्यात आल्या. मेहकर तालुक्यातील या नाट्यमय घटनाक्रम प्रकरणी हॉटेल चालकासह तिघांना गजाआड करण्यात आले. घटनाक्रम लक्षात घेतला तर यात आणखी काही जणांना अटक होण्याची किंवा नकली नोटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुरुवारी, २५ जुलै रोजी रात्री मेहकर येथील अग्रवाल वाईन शॉपी येथे एक जण ५ हजार रुपये घेऊन दारू घेण्यासाठी आला. मात्र, चाणाक्ष वाईन शॉप मालकाला ५०० रुपयांच्या नोटा पाहून थोडा संशय आला. मालकाने त्यांच्या मालकीच्या अग्रवाल पेट्रोल पंपावरील नोटा मोजण्याच्या मशीन मध्ये ‘चेक’ केल्या असता नोटा नकली असल्याची धक्कादायक बाब समोर आली. याची माहिती मालकाने तात्काळ मेहकर पोलिसांना दिली. यावरून पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने दारू विक्री केंद्रात आले.

पोलिसांनी लगेच दारू खरेदीला आलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करता आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली. आज, शुक्रवारी दुपारपर्यंत मेहकर पोलिसांनी ३ आरोपींना जेरबंद केले आहे. प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याचे या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दारू खरेदीसाठी मेहकर येथील अग्रवाल वाईन शॉपीवर ५ हजार रुपये घेऊन आलेल्या आरोपीचे नाव सोहम खेत्रे (रा. पिंपरी सरहद, ता.मेहकर) असे आहे. सोहम हा डोणगाव येथील जगदीश पांडव यांच्या हॉटेल मध्ये कामाला असतो. जगदीश पांडव याने त्याचा मित्र गजानन मुळे (राहणार डोणगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा) याच्याकडून पाच हजार रुपये उसने घेतले होते.

तेच पैसे हॉटेल मालक जगदीश पांडव याने आपला नोकर, सोहम खेत्रे याच्याकडे देऊन त्याला मेहकर येथून दारू आणायला पाठविले होते . त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गजानन मुळे हा असल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. हॉटेल मालक जगदीश पांडव यालाही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण हॉटेल मालकाला ५ हजार रुपये उसने देणारा मुख्य आरोपी गजानन मुळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे ३२ गुन्हे दाखल आहेत. आपण नकली नोटा जगदीश पांडव याला देत असल्याचे त्याला माहीत होते. दरम्यान गजानन मुळे याने हे पैसे कुठून घेतले याचीही माहिती पोलिसांना दिली आहे . त्यामुळे आता चौथा आरोपी देखील गजाआड करण्यासाठी मेहकर पोलीस प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले. याघटनेमुळे मेहकर तालुक्यातील नागरीक आणि व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026