प्रतिनिधी
दिनांक १०/१०/२०२२ रोजी भिगवण रोड येथील रिषभ होलसेल इलेक्ट्रीकल मटेरियल विक्रेते असून, सदर ठिकाणी ग्राहकाबरोबर दुकानमालकाचा काहीतरी गोधळ चालू असल्याचे पत्रकार बंधुना निदर्शनास आले व सदर घटना फोनव्दारे कळविण्यात आली. सदर ठिकाणी पत्रकार बघु पोहचले असता. बातमीच्या अनुशंगाने त्या ठिकाणी रिषभ इलेक्ट्रीकल दुकानाचे मालक केवल शहा व त्याची आई हे त्या ग्राहकाशी वाद घालत होते. ते अतिशय गलिच्छ भाषेत बोलत असताना तो प्रसंग पत्रकार बंधु मोबाईलमध्ये टिपत होते त्यावेळी त्यांच्या हातातील मोबाईल हॅण्डसेट हिसकावून घेवून केवल शहा याचे आईने पत्रकारास गाडी धरून ओळखपत्र पाहुन दुकानातून बाहेर हाकलले व म्हणाले तु कोण पत्रकार आहे बघू मी तुझे बापाला देखील घाबरत नाही असे म्हणुन पत्रकार बघु बरोबर असभ्य वागणुक देवून गैरवर्तणुक केलेली आहे. तसेच तिन्हाईत व्यक्तीचे मोबाईलवरून कॉल करून घटनास्थळी असलेले पत्रकार संदीप आढाव यांना फोन करून तुम्ही आमचे विरोधात जर ती दिली तर जड जाईल अशी धमकी दिली.
असा प्रकार हा बारामती सारख्या ठिकाणी घडत आहे. याचा खेद वाटते, सदर घडलेल्या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या व्यक्ती विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत सदर आरोपीची व दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेवून सखोल चौकशी करून योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व पत्रकार सर्व पत्रकार संघटना यांनी केली.