बारामती ! ग्रुपचे नाव माईक मध्ये घेतले नाही म्हणून दोघांना मारहाण ; वडगाव निंबाळकर दूरक्षेत्र करंजेपुल पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल .

क्राईम

प्रतिनिधी –

वाघळवाडी ता . बारामती येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमादिवशी आर आर ग्रुपचे नाव माईक मध्ये घेतले नाही या कारणावरून रितेश रणजीत रावळकर व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांनी सोमनाथ बाळासो बाबर व त्याचे मित्र विशाल बापू पाटोळे यांना लाकडी दांडक्याने , व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली .

मिळालेल्या माहितीनुसार ….

दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाघळवाडी ता. बारामती येथील स्मशानभूमी या ठिकाणी ईरटीका गाडीतून रितेश रंजीत रावळकर रा. वाघवाडी कन्नडवस्ती ता. बारामती जि.पुणे व त्याचे तीन अनोळखी साथीदार हे त्या ठिकाणी आले व त्यांनी सोमनाथ बाबर याला तू अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी रितेश रणजीत रावळकर यांचे आर आर ग्रुप चे नाव माईक मध्ये का घेऊन दिले नाही.

 या कारणावरून रितेश रावळकर व त्यांचे तीन अनोळखी साथीदार यांनी सोमनाथ बाळासो बाबर हा हिंदू मांग या जातीचे आहे हे माहीत असताना देखील त्याला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करून हाताने , लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व सोमनाथ बाबर याचा मित्र विशाल बापू पाटोळे तुम्ही याला का मारत आहात असे म्हणले असता त्यालाही लाकडी दांडक्याने रितेश रावळकर व त्यांच्या तीन साथीदार यांनी मारहाण केली व त्याच्या उजव्या कानावर , हातापायावर, व पाठीवर मारून गंभीर दुखापत केली आहे.

 तसेच रितेश रावळकर यांनी सोमनाथ बाबर व विशाल पाटोळे यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यावरून सोमनाथ बाबर यानी रितेश रावळकर व त्याचे अनोळखी तीन साथीदार याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 115(2),118,(2) 351(2)352 3(5) अँट्रॉसिटी का क 3(1)(R)(S)3(2)(V) 3(2)(vA),6 फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार सदरील घटनेतील एक आरोपीला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती हे करीत आहेत .