• Home
  • क्राईम
  • घर कामगाराकडून १८ लाखांचे दागिने लंपास, पाषाण परिसरातील घटना
Image

घर कामगाराकडून १८ लाखांचे दागिने लंपास, पाषाण परिसरातील घटना

प्रतिनिधी

घर कामासाठी ठेवलेल्या कामगाराने कपाटातील हिरेजडीत दागिने आणि रोकड असा १७ लाख ७० हजारांचा ऐवज चोरल्याची घटना पाषाण परिसरात घडली. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला पाषाण येथील सोमेश्वरवाडी भागात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. त्या व्यावसायिक आहेत. त्यांनी घरकामासाठी एकाला ठेवले होते. दोन वर्षांपासून तो महिलेच्या घरात काम करत होता. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून कामगाराने कपाटातील हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि रोकड असा १७ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. कामगार कामावर न आल्याने महिलेचा संशय बळावला. त्यांनी कपाटाची पाहणी केली. तेव्हा कपाटातील दागिने आणि रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.

Releated Posts

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

सहकारनगरातील पद्मावती परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड, तब्बल १५ वाहनांचे नुकसान

प्रतिनिधी पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByBymnewsmarathi Jan 22, 2026

बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह कारमध्ये आढळला!!

प्रतिनिधी बीड येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात कार्यरत राज्य कर निरीक्षक सचिन नारायण जाधवर (वय ३५)…

ByBymnewsmarathi Jan 18, 2026