राज्य राखीव पोलीस दल सेवा निवृत्त संघ मेळावा संपन्न

Uncategorized

प्रतिनिधी.

पुणे- येथील राज्य राखीव पोलीस दल सेवा निवृत्त संघ पुणे यांच्या वतीने 15, ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिना निमित्त निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या स्नेह मेळाव्यात देशभक्तीपर वैचारिक प्रबोधन व्याख्यान आयोजित करण्यात होते सुप्रसिद्ध व्याख्याते मा. दशरथ यादव सर हे महाराष्ट्रातील बुलंद आवाजाचे अभ्यासू प्रबोधनकार विचारवंत पंढरीच्या वाटेवर महाकादंबरीचे लेखक कवी पत्रकार नाटक चित्रपट गीतकार व्याख्याते हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभले होते.
स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष ‌एस.डी.गाडे माजी सहा समादेशक उपाध्यक्ष व्ही.जी.तळवार माजी सहा समादेशक संस्थापक आर.डी जाधव संयोजक राकेश डी. जाधवॲड प्रसाद आर .जाधव हे मान्यवर उपस्थित होते.
व्याख्यानमालेत पी .ओ जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले जगण्यासाठी ऊर्जा उर्मी देणारे कार्यक्रमाची शोभा म्हणजे जाधव साहेब त्यांच्या संकल्पनेतून स्नेह मेळावा म्हणजे एकत्र काम केलेल्या माणसांचे चेहरे समोर दिसावे गळाभेट व्हावी मग हाच एक उद्देश नसून आपण निवृत्त झालो हे विसरण्यासाठी एकत्र यावे ही धारणा मला वृद्धिंगत वाटते आरोग्य समृद्धी लाभो जुन्या आठवणींना उजाळा ताजा झाला असे ते व्यक्त झाले.
सेवानिवृत समादेशक मा.ईश्वर चौधरी साहेब म्हणाले
समोर बसलेले अधिकारी आणि कर्मचारी म्हणजे आठवणींचा गाव आहे .
शेकडो मैल दूर असलेल्या गावातुन पुण्यात आलो प्रशिक्षण काळात आणि सेवानिवृत्त होई पर्यत शिकत राहिलो त्यामुळे प्रत्येक जबाबदारी मी यशस्वी पार पडली आज या कार्यक्रमात येऊन मला खूप समाधान वाटले . माझ्या आयुष्याची खरी शिदोरी आज मला मिळाली
व्याख्याते दशरथ यादव यांनी म्हणाले वारी मुळे जगण्याला शिस्त येते उर्मी उर्जा मिळते शीण येत नाही विचारांचा गोतावळा निर्माण होतो मानवतेच दर्शन म्हणजे तुमचा शिस्तबद्ध पद्धतीने केलेली नोकरी खाकी वर्दीतली माणसे मला आज अनुभवायला मिळाली मला धन्यता वाटते माझ्या विचारांचा जागर आपण ऐकून घेतलात त्या बद्दल मी तुमच्या ऋणात राहू इच्छितो
या मेळाव्यात अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली या मेळाव्याचे सूत्रसंचालन लोककवी सीताराम नरके राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व यांनी आपल्या पहाडी आवाजात शीघ्रशैलीत गीत सादर करून सभागृहातील वातावरण प्रफुल्लित केले
आभारप्रदर्शन व राष्ट्रगीताने सांगता झाली