बारामती ! वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई ; सराईत दोन गुन्हेगारांना २ लाख १७ हजार रु किमतीचा मुद्येमालासह केले अटक .

Uncategorized

 .

प्रतिनिधी –

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील मोढवे ता. बारामती जि.पुणे गावचे हददीतुन उंबरवाडा बालगुडेवस्ती येथुन दि.११ जुलै २०२४ रोजी दुपारी ३:३० वा चे सुमारास संजना कांतीलाल शिंद रा. उंबरवाडा बालगुडेवस्ती मोढवे ता. बारामती यांना भोसले वस्ती कोठे आहे, असे विचारून त्यांचे जवळ जावुन साक्षीदार कुसुम बालगुडे यांचे डोक्यात चाकुने वार करून त्यांचे गळ्यातील मनी मंगळसुत्र हिसकावुन घेत असताना त्यांनी प्रतीकार केला असता, त्यांचे उजवे व डावे हातावर परत चाकुने वार केला तेव्हा संजना शिंदे या साक्षीदार कुसुम बालगुडे यांचे मदतीला गेल्या असता आरोपीनी फिर्यादीस संजना देखील चाकुने मारहाण करून तेथुन निघुन गेले .

याबाबत त्यांचेवर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नः २९१/२०२४ भा.न्या.सं. ३०९ (६),६२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुनहयाचे तपासात पोलिस प्रशासनाच्या गापेनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे संशईत इसम नामे विनोद मारूती नामदास रा. वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे, रोहीत विनायक जाधव रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे यांना ताब्यात घेऊन त्याचे कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हयाचे ठिकानावरून तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मन्यांची जबरी चोरी केलेचे कबुल केले. त्यांचेकडे .पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केली असता त्यातील आरोपी रोहीत विनायक जाधव याने मोढवे गावचे हददीत सन २०२२ साली जबरी चोरी तसेच वडगाव निंबाळकर गावचे हददीतील सन २०२४ साली निरा डावा कॅनॉलवर इलेक्ट्रीक मोटारची चोरी केलेचे कबुल केले आहे.

तरी सदर गुन्हयाचे कामी इसम नामे विनोद मारूती नामदास रा. वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे, रोहीत विनायक जाधव रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे यांना अटक केली आहे. तरी याचेकडुन खालील जबरी चोरी व इलेक्ट्रीक मोटार चोरी केलेले खालील ३ गुन्हे उघड झाले आहेत. १) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. २९१/२०२४ भा.न्या.सं. ३०९ (६),६२,३(५)
२) वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.नं. ६३/२०२४ भादवि ३७९ प्रमाणे
३)वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.नं. १६७/२०२२ भादवि ३९४,३४ प्रमाणे
तरी वरील तीन गुन्हयात मिळुन सोन्याचे मिनी गंठण, सोन्याची चैन, तीन ग्रॅम सोन्याचे मनी, टेक्स्मो कंपनीची मोटार, व गुन्यात वापरलेली शाईन
मोटारसायकल असा एकुन २,१७,०००/- रू मुददेमाल गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आलेला आहे.

तसेच सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर इतर पोलीस स्टेशन येथे खलीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
विनोद मारूती नामदास रा. वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे, याचेवर,
१) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. २९१/२०२४ भा.न्या.सं. ३०९ (६),६२,३ (५), २) जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६३२/२०२३भा.द.वि. कलम ३७९, ३) जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६८७/२०२३भा.द.वि. कलम ३७९, ४) जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६८९/२०२३भा.द.वि. कलम ३७९, ५) जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९०/२०२३भा.द.वि. कलम ३७९, ६) जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९२/२०२३भा.द.वि. कलम ३७९,प्रमाणे मोटारसायकलीचे गुन्हे दाखल आहेत

तसेच यातील आरोपी रोहीत विनायक जाधव रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे याचेवर, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. १) २९१/२०२४ भा.न्या.सं. ३०९ (६),६२,३(५) २) गु.र.नं. ६३/२०२४ भादवि ३७९ ३) गु.र.नं.
१६७/२०२२ भादवि ३९४,३४, ४) गु.र.नं. ६३/२०२४ भादवि ३७९, ५) गु.र.नं. ०१/२०१३ भादवि ३७९, ६) गु.र.नं. १४२/२०१३ भादवि ३७९ ७) गु.र.नं. १४४/२०१३ भादवि ३७९,३४, ८) गु.र.नं. २०/२०१३ भादवि ३७९,३४, ९) गु.र.नं.१८३/२०१२ भादवि ३७९,३४, १०) गु.र.नं. १३८/२०१३ भादवि ३७९,३४. ११) गु.र.नं. १९७/२०१५ भादवि ४०१, १२) गु.र.नं. १४७/२०१४ भादवि ३७९, १३) गु.र.नं. १३०/२०१३ भादवि ३७९,४११,३४,१४) गु.र.नं. ५०/२०१३ भादवि ३७९,३४, १५) गु.र.नं. १३५/२०१३ भादवि ३७९ ३४. प्रमाणे मोटार बोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. पंकज देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. रमेश चोपडे सो. अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, मा.श्री.सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री. अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन काळे, सपोनि संकपाळ स्था. गु.शा., वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोसई पांडुरंग कन्हेरे, पो हवा रमेश नागटीळक, महेश पन्हाळे, सागर देशमाने, अमोल भोसले, अनिल खेडकर, पो. ना भाउसो मारकड, हृदयनाथ देवकर, पोशि पोपट नाळे, तसेच सहाफौज बाळासाहेब कारंडे, पोहवा स्वप्नील अहिवळे, पवार, अभिजीत एकशिंगे स्था.गु.शा.पुणे ग्रा. यांनी केलेली आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई पांडुरंग कन्हेरे हे करीत आहेत.