• Home
  • क्राईम
  • मद्यालयातील बिलाच्या वादातून बाऊन्सरकडून सराइताचा खून, सिंहगड रस्ता भागातील घटना
Image

मद्यालयातील बिलाच्या वादातून बाऊन्सरकडून सराइताचा खून, सिंहगड रस्ता भागातील घटना

प्रतिनिधी

बिलावरून झालेल्या वादातून गुन्हेगाराचा मद्यालयातील अंगरक्षकाकडून (बाऊन्सर) सराइताच्या डोक्यात हातोडी मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री सिंहगड रस्ता परिसरात घडली. गोट्या उर्फ अमोल शेजवाळ (वय ३४, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या सराइताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अंगरक्षकासह तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाजवळ असलेल्या क्लासिक बारमध्ये शेजवाळ आणि त्याचे मित्र गुरुवारी रात्री गेले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास बिलावरून बारमधील व्यवस्थापक आणि शेजवाळ यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. बारमधील अंगरक्षक आणि शेजवाळ यांच्यात हाणामारी झाली. त्यावेळी अंगरक्षकाने शेजारी असलेल्या पंक्चरच्या दुकानातून हातोडी आणली. शेजवाळ याच्या डोक्यात हातोडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेजवाळविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026