मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 09 September 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व करंजेपुल दुरक्षेत्र येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न ; रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 9, 2024 1 मिनिट वाचन 8,520 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गणपती मंडळे, सर्व पोलीस पाटील तसेच सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार दि. ९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व वडगाव निंबाळकर अंकीत करंजेपुल पोलिस स्टेशन येथे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते . सकाळ पासून रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .

परिसरातील विविध गणेश मंडळ तसेच नागरिकांनी रक्तदान करत आपले कर्तव्य बजावले. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व सोमेश्वर पंचक्रोशी हद्दीतील रक्तदात्यांनी ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ अनुषंगाने रक्तदान करत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . या भव्य अश्या रक्तदान शिबिरामध्ये ३५१ रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून आपला हक्क बजावला . रक्तदान शिबिरासाठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे व त्यांच्या पूर्ण स्टाफ यांनी या रक्तदान शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख