• Home
  • माझा जिल्हा
  • घरगुती स्वयंपाकाचा गॅस एल पी जीमधील तोटा भरून काढण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना एकरकमी अनुदान म्हणून 22,000 कोटी रूपये देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरीप्रतिनिधी.
Image

घरगुती स्वयंपाकाचा गॅस एल पी जीमधील तोटा भरून काढण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना एकरकमी अनुदान म्हणून 22,000 कोटी रूपये देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरीप्रतिनिधी.

प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज  सार्वजनिक क्षेत्रातील तीन तेल विपणन कंपन्यांना  22,000 कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्याच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हे अनुदान इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)  या कंपन्यांमध्ये वितरीत केले जाईल.

या मंजुरीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील  तेल विपणन कंपन्यांना आत्मनिर्भर भारत अभियानाप्रति  त्यांची वचनबद्धता सुरू ठेवण्यास मदत होईल , त्याचबरोबर देशात एलपीजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित होईल आणि मेक इन इंडिया उत्पादनांच्या खरेदीला चालना  मिळेल.

आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांद्वारे ग्राहकांना घरगुती स्वयंपाकासाठीचे गॅस  सिलिंडर नियंत्रित किंमतींवर पुरवले जातात.

जून 2020 ते जून 2022 या कालावधीत, एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किमती सुमारे 300% ने  वाढल्या. परंतू आंतरराष्ट्रीय स्तरावरील एलपीजी किमतीतील चढ-उतारांपासून ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी, किमतीतील  ही वाढ पूर्णपणे घरगुती एलपीजीच्या ग्राहकांवर लागू केली नाही. त्यामुळे, या कालावधीत घरगुती एलपीजी सिलेंडरच्या  किमती केवळ 72% ने  वाढल्या आहेत. यामुळे या  तेल कंपन्यांचे  मोठे नुकसान झाले आहे.

हे नुकसान सहन करूनही, सार्वजनिक क्षेत्रातील या तीन तेल विपणन कंपन्यांनी देशात स्वयंपाकाच्या या अत्यावश्यक इंधनाचा निरंतर पुरवठा सुनिश्चित केला आहे.

Releated Posts

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध घेण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश.

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 BNS 137(2) मधील मुले 1) शुभम गणेश जाधव वय…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रतिनिधी पुणे, दि.२०: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीकरिता २ आणि २० डिसेंबर…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

सोमेश्वर’चे अनुदान धोरण फसवे; सभासदांची दिशाभूल थांबवा – शेतकरी कृती समितीचा कारखाना प्रशासनावर हल्लाबोल

​प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अलीकडेच जाहीर केलेले उसाचे अनुदान धोरण हे पूर्णपणे फसवे असून याद्वारे ऊस…

ByBymnewsmarathi Dec 16, 2025