• Home
  • क्राईम
  • नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याचे निमित्त,टोळक्याकडून काकाला बेदम मारहाण
Image

नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याचे निमित्त,टोळक्याकडून काकाला बेदम मारहाण

प्रतिनिधी

गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याने झालेल्या वादावादीत टोळक्याने काकाला दगडाने बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी साहेबराव भीमराव ओरसे (वय ५२, रा. पीएमसी कॉलनी, जनवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोहन जाधव, प्रतीक अलकुंटे आणि दोन साथीदार (सर्व रा. जनवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जनवाडीतील पीएमसी कॉलनीमध्ये सोमवारी रात्री पावणेबारा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमसी कॉलनीत गणपती मिरवणुकीत सर्व जण नाचत होते. यावेळी फिर्यादी यांचा पुतण्या यश ओरसे याचा धक्का लागला. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा मोहन जाधव आणि इतरांनी फिर्यादी सोबतचे सर्वांना शिवीगाळ केली. हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मोहन जाधव याने त्या ठिकाणी पडलेला दगड घेऊन फिर्यादीच्या तोंडावर, डोळ्याजवळ मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक कराडे तपास करीत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026