श्री क्षेत्र पैठण येथे संत चोखामेळा अभ्यासन केंद्र पुणे, विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान आणि वृंदावन फाऊंडेशन पुणे आयोजित दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन येथील संत एकनाथ नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

Uncategorized

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे हे या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष प्रा.संतोष तांबे, उद्घाटक कौतिकराव ठाले, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह दादा गोरे, संमेलनाचे संयोजक सचिन पाटील, डॉ. अलका सकपाळ, महेंद्र नरके असे अनेक मान्यवर संविधानात सहभागी झाले होते. ज्येष्ठ समीक्षक व मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले पाटील यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ग्रंथपूजन नाथ वंशज योगेश बुवा पालखीवाले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
ग्रंथदिंडी, किर्तन, कथाकथन, परिसंवाद, कविसंमेलन,भजन स्पर्धा इत्यादी उपक्रम संमेलनात आयोजित केले होते.
साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक प्रा. संतोष तांबे यांनी केले.
उद्घाटन प्रसंगी प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील म्हणाले ,अस्वस्थ सामाजिक वर्तमानात संतांचे विचार आणि जीवन समतेचा संदेश देणारे आहेत संतांचा वारसा लेखक कवीनी पुढे चालू ठेवला तर संत अध्यात्म जगाला कळेल शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा असे प्रतिपादन केले.
संयोजक सचिन पाटील म्हणाले, पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन आळंदी येथे संपन्न झाले असून महाराष्ट्रभर संमेलन होतील अशी ग्वाही दिली
संमेलनाध्यक्ष डॉ. प्रा. संदीप सांगळे म्हणाले, संत चोखामेळा हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते त्यांच्या अभंगांतून वास्तव दर्शन घडते विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन सदभावना व्यक्त केलेल्या दिसतात नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संत साहित्य मूल्य शिक्षण अभ्यासक्रमात समावेश केलेला असून संत चोखामेळा यांचे संत साहित्य विद्यापीठात अभ्यासक्रमात आहे‌.
अशा या दोन दिवसीय साहित्य संमेलनात संत चोखामेळा, विठ्ठल, तुकोबा ,सोयराबाई, कर्ममेळा बंका, निर्मळा यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कविसंमेलनामध्ये गीतकार माणदेश कविवर्य डॉ लक्ष्मण हेंबाडे लिखित बोल विठ्ठला विठ्ठला गीतांचे पोस्टर संमेलनाध्यक्ष डॉ. प्रा. संदीप सांगळे यांच्या शुभहस्ते प्रदर्शित करण्यात आले रसिक मायबापांना मंत्रमुग्ध करणारे गीत डॉ लक्ष्मण हेंबाडे यांनी सादर केले अन् सभागृहातील वातावरण प्रफुल्लित झाले
प्रेक्षकांच्या डोळ्यात विचारांचे अंजन घालणारे होते.
त्याप्रसंगी प्रा संतोष तांबे सचिन पाटील निवेदक रानकवी जगदीप वनशिव कविसंमेलन अध्यक्षा डॉ ऊर्मिला चाकुरकर निमंत्रित कवी साईनाथ फुसे, सरिता भांड, प्रा. अलका सकपाळ त्रिवेणी राणी चोपडे, शैलजा नाईकवाडे, चिराग फारूकी, दिलीप सनवे पुजा माळी शहादेव सुराशे, डॉ. मधुकर हुज,रे संदीप जगदाळे, डॉ. एकनाथ शिंदे,अरूण अहिरे, संध्याराणी कोल्हे यांनी बहारदार दमदार आवाजात संत साहित्याचा वारसा कवितेतून जीवनपट उलगडून मांडला गझल ,भावगीते, गझल ,मुक्तछंद, अभंगातून व्यक्त केला या ऐतिहासिक कविसंमेलन अध्यक्षा कवियत्री लेखिका डॉ ऊर्मिला चाकुरकर म्हणाल्या, कवितेतील शिस्तबद्ध पणा निवेदकांचा कडक आदेशाचे पालन करून सर्वच कवी कवयित्रीनी संत विचारांचा वारसा सांभाळत अप्रतिम रचना सादर केल्या असून सामाजिक बांधिलकी वैचारिक मंथन मार्मिक भाष्य करत आपले विचार प्रगट केलेत जगात रोजच वेगवेगळे प्रकार होतात अन् मन गहिवरून येते त्यांनी आपल्या कवितेत त्या व्यक्त होत्या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या शीघ्र चारोळ्या दमदार आवाजात सूत्रसंचालन केले
आभार मंगला कोळगे यांनी मानले समारोप पसायदानाने झाला पैठण येथील अनाथांच्या नाथ भूमितील झुंजे हाऊस मधील सभागृहात दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन संपन्न झाले