• Home
  • क्राईम
  • सायबर चोरट्यांकडून दोघांची ५७ लाखांची फसवणूक
Image

सायबर चोरट्यांकडून दोघांची ५७ लाखांची फसवणूक

प्रतिनिधी

सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र कायम आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर आणि वारजे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत एका तरुणाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कर्वेनगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर काही दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम (ऑनलाइन टास्क) केल्यास चांगले पैसे मिळतात, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी सुरुवातीला तरुणाला एक काम दिले. काम पूर्ण केल्यानंतर त्याला पैसेही दिले. त्यानंतर चोरट्यांनी त्याला ऑनलाइन टास्कमध्ये आणखी पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. चोरट्यांनी त्याच्याकडून वेळोवेळी ४१ लाख ९४ हजार रुपये घेतले. पैसे जमा केल्यानंतर तरुणाला परतावा दिला नाही. चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर तरुणाने संपर्क साधला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडाख तपास करत आहेत.

कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी शिवाजीनगर भागातील एका महिलेची १५ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. तुमच्या बँक खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार करण्यात आला आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळवावे लागेल. त्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेला एका बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १५ लाख रुपये जमा केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी तपास करत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026