• Home
  • क्राईम
  • नराधम बापाकडून मुलीवर बलात्कार, शाळेच्या ‘गुड टच बॅड टच’ उपक्रमात मुलीकडून वाच्यता
Image

नराधम बापाकडून मुलीवर बलात्कार, शाळेच्या ‘गुड टच बॅड टच’ उपक्रमात मुलीकडून वाच्यता

अश्लील चित्रीकरणे दाखवून पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या शाळेत आयोजित ‘गुड टच बॅड टच’ उपक्रमात मुलीने या विषयी वाच्यता केल्यानंतर याप्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करून ३५ वर्षीय नराधम बापाला अटक केली. भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (फ) (आय) (एम), ६५, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ४, ५ (एल) (एम) (एन) ६, ८, १०, १२ प्रमाणे पीडित मुलीच्या पित्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने फिर्याद दिली आहे.

पीडित मुलगी वारजे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. तिला आणखी चार बहिणी आहेत. तर, आई खासगी काम करते. फिर्यादी या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. त्या ३० सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे शाळेमध्ये कार्यालयीन कामकाज करीत होत्या. त्यावेळी शाळेच्या समाजसेविकेने त्यांच्याकडे येऊन एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर, मुख्याध्यापिकेने या समाजसेविकेसह पीडित मुलीला समुपदेशन कक्षात नेले. तेथे विश्वासात घेऊन तिची आपुलकीने विचारपूस करण्यात आली. त्यावेळी पीडित मुलीने तिचे वडील एक वर्षापासून जबरदस्तीने शारीरिक संबंध करीत असल्याची माहिती दिली. वडील हे कृत्य करीत असताना असह्य वेदना होतात. तसेच, हातपाय बांधून लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले.

आई कामावर गेल्यानंतर पिडीत मुलीच्या चार बहिणींना वडील आजीकडे जायला सांगतात किंवा त्यांना खाऊसाठी पैसे देऊन बाहेर पाठवतात. त्यानंतर वडील आईच्या मोबाईलमधील घाणेरडे चित्रीकरण पाहून तोंडात कापडाचा बोळा कोंबून तशी घाणेरडी कृती करतात. रात्री घरामध्ये सर्वजण झोपलेले असताना पीडित मुलीला झोपेतून उठवून इमारतीच्या टेरेसवर नेऊन बलात्कार करीत असल्याचे मुलीने मुख्याध्यापिकेला सांगितले. ही मुलगी पाचवीमध्ये असताना तिची आई गावी गेली होती. त्यावेळी देखील त्यांनी बलात्कार केल्याचे तसेच वारंवार मारहाण केल्याचे या मुलीने सांगितले.

दरम्यान, या प्रकाराच्या चौकशीसाठी वडिलांना आणि आईला शाळेत बोलावून घेण्यात आले. तिच्या आईचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये अश्लील चित्रीकरण असल्याचे समोर आले. त्यानंतर, आई-वडिलांना मुलींना का मारता अशी विचारणा केली. तेव्हा मुलगी ऐकत नाही. ती रात्रभर मोबाईल पाहत असते. तिला धाक बसावा याकरिता तसेच आमचे ऐकण्यासाठी मारल्याचे पालकांनी सांगितले. त्यावेळी मुख्याध्यापिकेने लहान मुलांना मारहाण करु नका अशी समज देत मुलीकडे असलेला मोबाईल चौकशीसाठी ठेवून घेतला.

त्यानंतर १५ मिनिटांनी पुन्हा मुलीचे वडील शाळेमध्ये आले. छोट्या सुटीमध्ये मुलीच्या वर्गाबाहेर बोलावून घेत आपल्या दोघांमध्ये घरी घडत असलेला प्रकार कोणाला सांगू नकोस. नाहीतर घरी आल्यानंतर तुला पुन्हा मारीन अशी धमकी दिली. त्यावेळी पीडित मुलीने समाजसेविकेला याविषयी जाऊन सांगितले. शाळेच्या वतीने तात्काळ पोलिसांना संपर्क साधून माहिती देण्यात आली.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026