Image

पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार

प्रतिनिधी

कोंढवा भागातील बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर कोंढवा भागात पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी दहा, अकरा, तसेच तेरा वर्षाच्या मुलाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित मुलाच्या पालकांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि गु्न्हा दाखल करण्यात आलेली अल्पवयीन मुले एकाच सोसायटीत राहायला आहेत.

पाच वर्षांचा मुलगा सोसायटीच्या आवारात खेळत होता. त्यावेळी मुलांनी सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या मुलाला मोबाइलवरील अश्लील चित्रफीत मुलाला दाखविले. मुलाशी अश्लील कृत्य केले.

त्यानंतर पीडित मुलाशी अल्पवयीनांना पु्न्हा अश्लील कृत्य केले. मुलांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे पाच वर्षांच्या मुलांनी या प्रकाराची माहिती पालकांना दिली. पालकांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. कोंढवा पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

वानवडी भागातील दोन शाळकरी मुलींशी व्हॅनचालकाने अश्लील कृत्य केल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर खराडी भागातील एका नामांकित शाळेतील तिसरीतील मुलीबरोबर शाळेच्या आवारात अश्लील कृत्य करण्यात आल्याची घटना घडली. शहर, परिसरात अल्पवयीन मुलांवर गेल्या नऊ महिन्यांत अत्याचाराच्या ३०० हून जास्त घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हे दाखल केले आहेत.

Releated Posts

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध घेण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश.

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 BNS 137(2) मधील मुले 1) शुभम गणेश जाधव वय…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रतिनिधी पुणे, दि.२०: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीकरिता २ आणि २० डिसेंबर…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025