• Home
  • क्राईम
  • शर्ट नीट न खोचल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा
Image

शर्ट नीट न खोचल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी

शर्ट नीट न खोचल्याने एका शाळेतील शिक्षकाने सहावीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

रक्तबंबाळ झालेला विद्यार्थी घरी पोहोचल्यानंतर पालकांच्या लक्षात हा प्रकार आला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.संदेश भोसले (वय २६) असे गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

याबाबत मुलाच्या वडिलांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वारगेट परिसरातील महर्षीनगर येथील एका शाळेत २७ सप्टेंबर रोजी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा अकरा वर्षीय मुलगा सहावीत आहे. २७ सप्टेंबर रोजी संगणक अभ्यासक्रम वर्ग सुरू होता. त्या वेळी शिक्षक संदेश भोसले यांनी शर्ट नीट का खोचला नाही, अशी विचारणा करून मुलाला बेदम मारहाण केली. मुलाचे नाक आणि कानातून रक्तस्त्राव झाला.

शाळेतून घरी आल्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या मुलाला आईने पाहिले. मुलाकडे तिने विचारणा केली. तेव्हा शर्ट नीट न खोचल्याने शिक्षक भोसले यांनी मारहाण केल्याची माहिती त्याने आईला दिली.

त्यानंतर पालकांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल केला असून, संबंधित शिक्षकाला नोटीस बजाविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी दिली.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026