• Home
  • क्राईम
  • दुचाकी पुढे नेण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून तरुणाचा खून
Image

दुचाकी पुढे नेण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून तरुणाचा खून

प्रतिनिधी

दुचाकी पुढे नेण्याच्या (ओव्हरटेक) वादातून तरुणाचा अल्पवयीनांनी कोयत्याने वार करुन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द भागात घडली. अल्पवयीनांनी तरुणावर तब्बल ३५ वार केले. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.

अभय मारुती सुर्यवंशी (वय २०, रा.गणेशनगर कॉलनी, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून करणारे युवक अल्पवयीन आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय हा एका मिठाई विक्री दुकानात काम करतो. अल्पवयीन युवक आणि अभय एकाच भागात राहायला आहेत. दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गणेशनगर कॉलनीतील घरासमोर अभय थांबला होता. त्यावेळी अल्पवयीनांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. अल्पवयीनांनी त्याच्यावर एकापाठोपाठ तब्बल ३५ वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पसार झालेल्या दोघांना रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याबरोबर असलेला एक साथीदार शहरातून पसार झाला आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

याप्रकरणातील एका अल्पवयीनाविरुद्ध चार दिवसांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले होते. बाल न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतर दोनच दिवसात त्याने खून केला. पोलीस निरीक्षक क्षीरसागर तपास करत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026