प्रतिनिधी
नोकरीच्या आमिषाने पुण्यात आणून वेश्या व्यवसायास तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात छापा टाकून पाच तरुणींची सुटका केली. या तरुणींपैकी दोघींना त्यांच्या पतीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे.
याप्रकरणी सुमी सौरभ बिश्वास (वय ३५, रा. मरगी गल्ली, बुधवार पेठ, मुळ रा. बोनगाव, जि. चातपाडा, कोलकाता), कुंटणखाना व्यवस्थापक विक्रम आसीम बिश्वास (वय २३, रा. मरगी गल्ली, बुधवार पेठ), विकास उजल मंडोल (वय २१), टॉनी युनुस मुल्ला (वय ३२) यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. याबाबत अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फ्रिडम फर्म संस्थेचे प्रतिनिधी अब्राहम हेगडे, रेश्मा तुपकर, सीमा आरोळे यांनी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांना बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय प्रवृत्त केले जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संगीता जाधव, हवालदार रेश्मा कंक आणि त्यांच्या पथकाने छापा घालून तरुणींची सुटका केली.
पाच महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमधील नोकरीचे आमिष दाखवून तिची दलालांनी बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विक्री केल्याची माहिती मिळाली. मुंबईतील एका तरुणीला चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिची विक्री करण्यात आल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. एका तरुणीला जयपूरहून बुधवार पेठेतील कुंटणखान्यात आणण्यात आले. चौथ्या तरुणीला तिचा पती टॉनी याने कुंटणखाना चालिकेला सांगून वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले होते. आरोपी विशाल मंडोल याने पश्चिम बंगालमधील एका १९ वर्षाच्या तरुणीबरोबर विवाह केला. त्यानंतर तो तिला गावाहून घेऊन पुण्यात आला. त्याने तिला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले.