• Home
  • क्राईम
  • शाळेत झालेल्या वादातून वर्गात विद्यार्थ्यांचा गळा चिरला- नववीतील विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद
Image

शाळेत झालेल्या वादातून वर्गात विद्यार्थ्यांचा गळा चिरला- नववीतील विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद

प्रतिनिधी

वार्षिक समारंभावरुन झालेल्या वादातून नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मांजरी भागतील एका शाळेत ही घटना घडली. याप्रकरणी एका १४ वर्षीय मुलाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत १५ वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मांजरीतील एका शाळेत नववीत तक्रारदार मुलगा शिकायला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला मुलगा त्याच्या वर्गात आहे. शाळेत वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. वार्षिक समारंभाच्या आयोजनावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास मुलगा वर्गात बसला होता. त्यावेळी वर्गातील मुलगा पाठीमागून आला. त्याने काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला. या घटनेत तो जखमी झाला. मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर वर्गात मुले घाबरली.

या घटनेनंतर गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाने त्याला धमकावले. त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या मुलाला शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक दादासाहेब रोकडे तपास करत आहेत.

Releated Posts

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

सहकारनगरातील पद्मावती परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड, तब्बल १५ वाहनांचे नुकसान

प्रतिनिधी पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByBymnewsmarathi Jan 22, 2026