संपादक मधुकर बनसोडे
मागील काही दिवसापूर्वी बारामती तालुक्यातील निंबुत, खंडोबाचीवाडी, गरदवाडी, व ,परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि अशातच शेतात पावसाचे पाणी शिरले. यामध्ये प्रामुख्याने बाजरी, मक्का, उसाचे आडसाली लागण्याचे पीक, कोथिंबीर, याचं भल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं प्रशासनाकडून पाऊस झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या नुकसानाचा पाहणी दौरा देखील केला लगेच काही दिवसातच झालेल्या नुकसानाच्या पिकाचे पंचनामे झाले मात्र अद्यापही त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही अगोदरच पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी हताश होऊन बसलेला आहे त्यातच दिवाळीचा सण येतोय कशी होणार मायबाप शेतकऱ्यांची दिवाळी कधी मिळणार शेतकऱ्याला नुकसान भरपाई. का शेतकर्याने भरलेल्या फॉर्म ची फाईल अडगळीतच पडणार? अशी चर्चा नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत निम्मा ऑक्टोबर महिना संपत आला तरीही पाऊस थांबायचं नाव घेईना अगोदरच पावसाने शेतकऱ्याचे भले मोठे नुकसान केले आहे मायबाप सरकार थोडसं आमच्याकडेही लक्ष द्या आमची सुद्धा दिवाळी साजरी करू द्या शेतकऱ्याची प्रशासनाला भावनिक साद