बारामती! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दितील घरफोडी, जबरी चोरी या दाखल गुन्ह्यातील आरोपींकडून जप्त केलेला 5,50,000 रू किमंतीचे दागिने व रोख रक्कम फिर्यादीस प्रदान समारंभ कार्यक्रमाचे आयोजन . 

क्राईम

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील झालेल्या घरफोडी ,जबरी चोरी यामधील पोलिस प्रशासनाने आरोपींकडून जप्त केलेल्या मालमत्ता फिर्यादीस प्रदान करण्याचा कार्यक्रम दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता . यामध्ये वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील गावांमधील खालील फिर्यादींना मुद्देमाल प्रदान करण्यात आला.

1) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 191/2019 भादवि कलम 394,34. मधील फिर्यादी श्री. जगन्नाथ दादा खोमणे रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे

2) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 281/2021 भादवि कलम 392 मधील फिर्यादी सौ. लक्ष्मी देविदास गवळी रा.उंडवडी सुपे ता. बारामती जि. पुणे

3)वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 415/2022 भादवी कलम 395 मधिल फिर्यादी सौ पुष्पलता बाळासाहेब जगताप रा. चोपडज ता. बारामती जि. पुणे

4) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 62/2021 भादवि कलम 457,380 मधिल फिर्यादी रोहन अशोक गायकवाड राहणार सोनकसवाडी ता. बारामती जि. पुणे

5) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 291/2024 बी एन एस कलम 309(6) मधिल फिर्यादी कुसुम सोमनाथ बालगुडे रा. मोडवे ता. बारामती जि. पुणे.

6) गुन्हा रजिस्टर नंबर 167/2022 भादवी कलम 394 फिर्यादी सौ.अनिता उत्तम जगदाळे राहणार मुर्टी ता. बारामती जि. पुणे

7) गुन्हा रजिस्टर नंबर 434/2024 फिर्यादी सौ. नीलम तानाजी खोमणे रा.मुर्टी ता. बारामती जि.पुणे

वरील प्रमाणे फिर्यादीना त्यांचे घरफोडी, जबरी चोरी गुन्हयातील चोरीस गेलेल्या माला पैकी आरोपीतांकडुन जप्त करण्यात आलेला मुद्देमाल असा एकूण 7 तोळे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीच्या 5 पट्ट्याा व रोख रक्कम 7960 असा एकूण किंमत 5,50,000/- रुपये किमतीचा गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल मा. श्री. पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली, मा. श्री गणेश बिरादार अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग,पुणे ग्रामीण यांचे शुभ हस्ते, मा. श्री सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती यांचे प्रमुख उपस्थितीत, मा. सचिन काळे प्रभारी अधिकारी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेषन , पोसई राहुल साबळे, पोसई दिलीप सुतार, पोहवा महेष पन्हाळे, अनिल खेडकर,हृदयनाथ देवकर,पोपट नाळे, विलास ओमासे म.पो.षि. प्राजक्ता जगताप तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडील सर्व पोलीस स्टाफ यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करून सदरचा मुद्देमाल तक्रारदार यांना परत करण्यात आला.