मु.सा. काकडे महाविद्यालय वाणिज्य विभाग आणि संशोधन केंद्राचा विद्यार्थी साजिद सय्यद यांचे सीए परीक्षेत यश.

Uncategorized

प्रतिनिधी.
गुरुवार दि. २ जानेवारी २०२५(सोमेश्वर नगर): येथील मु.सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगरच्या वाणिज्य विभाग आणि संशोधन केंद्राचा विद्यार्थी साजिद नजमुद्दिन सय्यद याने भारत सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या संस्थेची सनदी लेखापाल (सी.ए.) ही पदवी प्राप्त केली असून नुकत्याच जाहीर झालेल्या संस्थेच्या निकालामध्ये त्याने हे दैदिप्यमान यश संपादन केलेले आहे. अत्यंत कठीण अभ्यास पातळी असलेली ही परीक्षा त्याने उत्तीर्ण केल्याबाबत महाविद्यालयाच्या वतीने नुकताच त्याचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सतीश भैय्या काकडे-देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, मा. अभिजीत भैय्या काकडे-देशमुख व्यवस्थापन समितीचे सचिव मा. सतीश लकडे महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. देविदास वायदंडे आणि महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी साजिद सय्यद यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. साजिद सय्यद हे मूळचे वाठार बु. तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील सामान्य कुटुंबातील रहिवासी असून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आहेत. पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या साजिद सय्यद यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केले आहे. सध्या ते मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग आणि संशोधन केंद्रात पी.एचडी. करत आहेत. त्यांनी मिळवलेल्या या विषयाबद्दल परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.