• Home
  • क्राईम
  • उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्याला धक्काबुक्की, गावठी दारुचा टेम्पो घेऊन आरोपी पसार
Image

उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्याला धक्काबुक्की, गावठी दारुचा टेम्पो घेऊन आरोपी पसार

प्रतिनिधी

बेकायदा गावठी दारु वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागातील (स्टेट एक्साईज) दुय्यम निरीक्षकालाच्या दुचाकीला मोटारीची धडक देण्यात आली. कारवाई केलेला टेम्पो घेऊन आरोपी पसार झाल्याची घटना नगर रस्त्यावरील भावडी गावात घडली. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक विशाल कदम (वय ३०) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक विशाल कदम नगर रस्ता भागातील भावडी गावात कारवाईसाठी गेले होते. त्या वेळी टेम्पोतून गावठी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

भावडी गावातील रस्त्यावर त्यांनी टेम्पो अडविला. पाठीमागून येणाऱ्या एका मोटारीने दुचाकीस्वार कदम यांना धडक दिली. दुचाकीस्वार कदम रस्त्यात पडले. कारवाई केलेला टेम्पो घेऊन चालक पसार झाला. अंधारात मोटारचालकही पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार तपास करत आहेत.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026