• Home
  • माझा जिल्हा
  • श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात प्रजासत्ताक दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा…
Image

श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात प्रजासत्ताक दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा…

प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात रविवार दि.२६ जाने.२०२५ रोजी भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. साहेबराव दादा सोसायटी, निंबुत ग्रामपंचायत व पशुवैद्यकीय दवाखाना येथील ध्वजारोहण करून विद्यार्थी विद्यालयाच्या प्रांगणात जमले. विद्यालयाचे ध्वजारोहण निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मा.श्री. भीमराव बनसोडे सर यांच्या शुभहस्ते झाले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले व विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा आपल्या प्रास्ताविकातून घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली.
मान्यवर मनोगतांमध्ये संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे दे.यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व क्रीडा स्पर्धेत विविध खेळांत पारितोषिके प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२४ मध्ये विद्यालयात इयत्ता १०वी त प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास पत्रकार दत्ता माळशिकारे यांच्या वतीने देण्यात आलेले बक्षीस वेदांत चंद्रकांत केंजळे या विद्यार्थ्यास प्राप्त झाले. यावेळी विद्यालयातील सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी व मेडल देऊन करण्यात आला.
यावेळी घर-घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ती गीतांवर नृत्य करून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला व प्रेक्षकांची वाह वा मिळवली.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रेखाटन केलेल्या चित्रांचे प्रदर्शन देखील यावेळी भरवण्यात आले होते. मान्यवरांनी ही रेखाटने पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सतीशभैय्या काकडे दे.उपाध्यक्ष मा.श्री. भीमराव बनसोडे,मानद सचिव मा. श्री. मदनराव काकडे दे.साहेबराव दादा सोसायटीचे चेअरमन श्री.अजितराव काकडे ज्येष्ठ संचालक श्री.मुकुंदराव काकडे ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रमोद बनसोडे श्री.अभय काकडे श्री.प्रकाश काकडे पत्रकार श्री.मधुकर बनसोडे तलाठी भाऊसाहेब, सौ. तनपुरे मॅडम ज्युबिलंट भारतीया फाउंडेशन सी.एस.आर. प्रमुख फुंडे मॅडम व बहुसंख्य ग्रामस्थ महिला मंडळ,तरुण मंडळे, अंगणवाडी सेविका, जि.प. प्राथमिक शाळा विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025