• Home
  • माझा जिल्हा
  • कायदे महिलांच्या सुरक्षिततेसाठी मात्र त्याचा दुरुपयोग होता कामा नये ॲड. सुप्रिया विशाल बर्गे.
Image

कायदे महिलांच्या सुरक्षिततेसाठी मात्र त्याचा दुरुपयोग होता कामा नये ॲड. सुप्रिया विशाल बर्गे.

प्रतिनिधी.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंकित करंजे पूल पोलीस ठाणे व शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ,करंजे. तालुका बारामती, जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इथे अ‍ॅण्ड विशाल विजय कुमार बर्गे यांनी नवीन फौजदारी कायदा(BNS, BNSS, BSB) व पोलिसांचे अधिकार या बाबत माहिती दिली. तसेच अँड सुप्रिया विशाल बर्गे यांनी तरुणींना ‘पोस्को कायदा’ बद्दल मार्गदर्शन तारीख 4/2/2025 रोजी केले .

मार्गदर्शन करताना अँड विशाल बर्गे यांनी सांगितले की पोलिसांना या दुरुस्त कायद्यात जास्त अधिकार दिलेले आहेत. सात वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गंभीर गुन्ह्यातील तपास करताना घटनास्थळ चित्रिकरण करणे बंधनकारक केले आहे . तसेच पोलिसांना गांभीर् गुन्ह्य़ात दोषारोपपत्र दाखल करायला 180 दिवस पर्यन्त ज्यादा कालावधी दिलेला आहे. पूर्वी 90 दिवसांत तपास पूर्ण करायला लागायचा.


तसेच पुरावा गोळा करताना आरोपीचे हस्ताक्षर, सही, हाताचे ठसे, आवाजाचे सॅम्पल जप्त करता येणार आहेत त्याला वेगळी परवानगी कोर्टाकडून घ्यायची गरज नाही. तसेच पूर्वी मात्र आरोपींना सदर पुरावा पोलिसांना देणे बंधनकारक नव्हते. त्यामुळे ठोस पुरावा अभावी आरोपी निर्दोष मुक्त होत होते.
आता नवीन दुरुस्ती नुसार तपास करणारे पोलीस अधिकारी यांना 90 दिवसापर्यंत आरोपीची पोलीस कोठडी मागता येणार आहे. पूर्वी केवळ चौदा दिवस मागता येत होती.
तसेच इलेक्ट्रिक पुरावा म्हणजे ईमेल, मोबाईल, कॉम्प्युटर, मोबाईल एसएमएस हाही पुरावा म्हणून कोर्टात सादर करता येणार आहे.

मुलीना मार्गदर्शन करताना अँड सुप्रिया बर्गे म्हणाल्या की,
फसवेपणाला भूलथापांना मुलींनी बळी पडू नये. सरकारी नोकरीत, स्पोर्ट , आर्मी मध्ये आता मुलींना आरक्षण दिले आहे. शिक्षण सुद्धा मोफत झालेले आहे.त्यामुळे त्यांनी आपल्या पायावर उभे राहून सक्षम बनले पाहिजे. जेणे करून तुमच्या भावी आयुष्यात तुम्हाला आर्थिक अडचण येणार नाही. तुम्हाला होणाऱ्या अडचणी, लैंगिक छळ, मुलांकडून होणारा त्रास पोलिसांना,घरच्यांना किंवा आईवडील यांना ठामपणे सांगता आला पाहिजे.

जेणे करून वेळेत त्यावरीत कारवाई करता येईल व भविष्यातील होणारा एखादा गंभीर गुन्हा थांबवू शकतो.


तरुणी ही कुटुंबाची इज्जत असते. ती विवाहानंतर माहेर व सासर चा आधारस्तंभ होऊ शकते. त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला कमी पणा येईल असे वागले नाही पाहिजे. हे त्यांनी सांगितले.


तुमचे आईवडील ,नातेवाईक, गुरुजन वर्ग यांना तुमचा अभिमान वाटेल अशीच प्रगती केली पाहिजे. असे सुप्रिया बर्गे वकील यांनी प्रतिपादन केले.

त्यावेळी डॉ संपतराव सुर्यवंशी, प्राचार्य सोमेश्वर सायन्स कॉलेज यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यावेळी शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थेचे प्रो संजय देवकर , वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री सचिन काळे साहेब व पोलीस उपनिरीक्षक श्री राहुल साबळे साहेब, पोलीस नाईक रमेश नागटिळक, वारुळे साहेब भोसले साहेब व इतर पोलीस वर्ग,सुचित्रा ताई साळवे , पंचक्रोशीतील सर्व पोलीस पाटील, प्राध्यापक कर्मचारी, स्टाफ हे हजर होते.

मान्यवरांची ओळख प्रो सूर्यवंशी सर यांनी करून दिली. तसेच आभार प्रदर्शन पोलीस नाईक वारुळे साहेब यांनी केले.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025